

Female Suicide Bombers Behind Major Baloch Attacks In Pakistan
Esakal
पाकिस्तानमध्ये शनिवारी रात्री बलूचिस्तान लिबरेशन आर्मीकडून करण्यात आलेल्या आत्मघाती हल्ल्यात १०० पेक्षा जास्त सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. एकाच वेळी पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये हे हल्ले झाले. यामुळे पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झालंय. बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने दावा केला की हे हल्ले दोन महिलांनी केले होते. यात एका महिलेचं नाव आसिफा मेंगल असं आहे. २४ वर्षीय आसिफा विद्रोही बनली होती.