चीनमध्ये बैरूतसारखा भीषण स्फोट; अनेक घरांचे छप्पर उडाले

वृत्तसंस्था
Saturday, 15 August 2020

काही दिवसांपूर्वी लेबनॉनची राजधानी बैरूत येथे मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात १७८ लेबनॉन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

बीजिंग (Beijing) : चीनच्या शांडोंग प्रांतात (Shandong) बैरूतसारखा (Beirut) भीषण स्फोट झाला आहे. चीनी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पूर्व चीनच्या शांडोंग प्रांतातील बाजारपेठेजवळ हा स्फोट (Blast) झाला. या स्फोटोत दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सीजीटीएन या वृत्तसंस्थेने दिली आहे. स्फोटानंतर धुराचे प्रचंड मोठे लोट आकाशात उडाल्याचे पाहायला मिळाले. या भीषण स्फोटात अनेक घरांची छप्परे उडाली, तसेच घरांमध्ये वापरण्यात आलेल्या काचांचे तुकडे झाले.

US Election:"जो बायडेन राष्ट्रपती झाले तर अमेरिका जगभरात थट्टेचा विषय होईल"​

ग्लोबल टाईम्सच्या अहवालानुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. शेतकर्‍यांच्या वस्तू ज्या ठिकाणी ठेवल्या होत्या, त्या ठिकाणी हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती तपासातून पुढे आली आहे. लाकूड तोडताना विजेच्या तारांमध्ये बिघाड झाला आणि त्यानंतर लागलेल्या आगीमुळे हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटामुळे रस्त्यावर राडारोडा पडला होता. तसेच रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्यांचेही नुकसान झाले आहे. 

भारताच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानच्या वेबसाईटवर 'जय श्रीराम'!​

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लेबनॉनची राजधानी बैरूत येथे मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात १७८ लेबनॉन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बैरूत बंदरातील गोदामात (वेअर हाऊस) २७५० टन अमोनियम नायट्रेट गेल्या ६ वर्षांपासून ठेवण्यात आले. हे अमोनियम नायट्रेट खत निर्मितीसाठी वापरले जायचे. मात्र, या भीषण स्फोटानंतर संपूर्ण बैरूत शहर उद्ध्वस्त झाले आहे.

बैरूतमधील स्फोट इतका भयानक होता की, या स्फोटामुळे निर्माण झालेल्या धुराचे लोट दीड किमी अंतरावरून सहज नजरेस पडत होते. बैरूतमधील बंदर परिसरात एक आणि शहरी भागात एक असे दोन स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या स्फोटात ५ भारतीय नागरिक किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two killed in warehouse blast in east China Shandong