चीनमध्ये उईगर मुस्लिमांचा नरसंहार; अमेरिका निर्बंध लादणार?

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 17 October 2020

चीनमध्ये उईगर मुस्लिमांवर अत्याचार होत आहे.

वॉशिंग्टन- चीनमध्ये उईगर मुस्लिमांवर अत्याचार होत आहे.  चीनची कम्युनिस्ट पार्टी अल्पसंख्याक असलेल्या उईगर समाजाचा छळ करत आहे. या मुद्द्यावरुन अमेरिकेने चीनला धारेवर धरले आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी चीनमध्ये नरसंहार सुरु आहे किंवा चीन नरसंहाराच्या जवळ आहे, असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिका चीनवर नरसंहाराच्या मुद्द्यावरुन बंदी आणण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

चीनच्या शिनजीयांग प्रांतात उईगर मुस्लिमांना कम्युनिस्ट पार्टीकडून छळ सहन करावा लागत आहे. तेथे नरसंहार सुरु आहे किंवा तसे करण्याच्या तयारीत चीन आहे. त्यामुळे चीनविरोधात कठोर निर्णय घेण्याची गरज आहे, असं रॉबर्ट म्हणाले आहेत. ते एका ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते. पहिल्यांदाच अमेरिकेतील एका उच्च पदावरील व्यक्तीने चीनवर थेटपणे नरसंहाराचा आरोप केला आहे. त्यामुळे रॉबर्ट यांच्या या वक्तव्याला विशेष महत्व आहे. 

राजकुमार रावच्या ‘छलांग’ची चर्चा; ट्रेलर झाला व्हायरल   

चीनमध्ये लाखो मुस्लिमांना छळ छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. शिवाय अनेक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार तेथे मुस्लिमांविरोधात नरसंहार सुरु आहे. असे असले तरी चीनने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शिनजिंयाग प्रांतात छावण्या आहेत. पण येथे लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि कट्टरतावादापासून वाचण्यासाठी शिक्षण देण्यात येत असल्याचा दावा चीनने केला आहे. 

अमेरिकेच्या बॉर्डर कस्टम विभागाने उईगर मुस्लिम महिलांच्या डोक्यावरील केसांपासून तयार केलेली अनेक उत्पादने जप्त केली आहेत असा गंभीर आरोप ब्रायन यांनी केला आहे. उईगर मुस्लिम महिलांच्या डोक्यावरील केसांपासून विविध वस्तू बनवल्या जात आहेत आणि याच वस्तू अमेरिकेत पाठवल्या जात असल्याचं ते म्हणाले आहेत. अमेरिकेच्या बॉर्डर कस्टम विभागाने शिनजिंयाग प्रांतातून येणारे शिपमेंट रोखले असल्याचे रॉबर्ट यांनी सांगितले. 

बालकांच्या हत्याकांडाचा खटला जलद गती न्यायालयात : गृहमंत्री देशमुख

मागील महिन्यात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनीही चीनवर टीका केली होती. चीनमध्ये जे घडत आहे ते धक्कादायक आणि विचलित करणारे असल्याचे ते म्हणाले होते. चीन मुस्लिम अल्पसंख्याकांचा छळ करत आहे. त्यांना जबरदस्तीने फॅमिली प्लॅनिंग करण्यास भाग पाडत आहे, असं ते म्हणाले होते. दरम्यान, मध्य आशियातील तुर्कस्तानमधून वेगवेगळ्या कारणांमुळे वारंवार स्थलांतरित झालेले उईगर मुस्लिम चीनमधील शिनजियांग प्रांतात आहे. ते अनेक वर्षांपूर्वी येथे राहत आले आहेत. ते स्वतःला चिनी तुर्कस्तानी म्हणवून घेतात. एकेकाळी शिनजियांग प्रांतात ते बहुसंख्यांक होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uighar muslim issue america criticize china