UK PM Race : ऋषी सुनक Vs लिझ ट्रस; लाईव्ह डिबेटनंतर ठरणार पंतप्रधान

बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर नव्या पंतप्रधानपदासाठी निवडणूक होत आहे.
Rishi Sunak Indian descent UK Prime minister
Rishi Sunak Indian descent UK Prime ministerRishi Sunak Indian descent UK Prime minister

British PM Race : ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठीची चुरस आता अंतिम टप्प्याकडे पोहोचली असून, भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी बुधवारी शेवटच्या फेरीतही आघाडी घेत अंतिम फेरीत गाठली आहे. आता सुनक आणि लिझ ट्रस यांच्यामध्ये लाईव्ह डिबेट रंगणार आहे. मतदानाच्या शेवटच्या फेरीत सुनक यांनी 137 मतांनी विजय मिळवला. मात्र, यापुढील वाट सुनक यांच्यासाठी कठीण असणार आहे. कारण त्यांना आता टोरी सदस्यांच्या मतदानाचा सामना करावा लागणार आहे. बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर नव्या पंतप्रधानपदासाठी निवडणूक होत आहे.

Rishi Sunak Indian descent UK Prime minister
शरद पवारांचा मोठा निर्णय;राष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त

लाईव्ह डिबेटमध्ये रंगणार स्पर्धा

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुनक आणि ट्रस हे दोनच उमेदवार उरले आहेत. या दोघांमध्येही येत्या सोमवारी थेट चर्चा होणार आहे. पंतप्रधानांच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी, सुनक यांना आता अंदाजे 160,000 कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या मतदारांना त्यांच्या बाजूने पोस्टल मतपत्र देण्यासाठी मनवावे लागणार आहे. त्यानंतरच या टप्प्यात मिळालेले यश त्यांना ब्रिटनचे पंतप्रधान बनवू शकणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून अनेक डिबेटमध्ये सुनक यांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक यांच्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे.

Rishi Sunak Indian descent UK Prime minister
शिंदे सरकार लवकरच करणार 100 दिवसांच्या संकल्पपत्राची घोषणा

कोण आहेत ऋषी सुनक ?

ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे भारतीय उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. सुनक हे ब्रिटनचे रहिवासी असून, सध्या ते ब्रिटनच्या अर्थमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. ते ब्रिटनमधील रहिवासी असले तरीही त्यांची पाळंमुळं मात्र भारताशी जोडली गेली आहेत. सध्याच्या घडीला सुनक यांच्या कामानं अनेकजण प्रभावित असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय त्यांना पंतप्रधानपदासाठीचा प्रबळ दावेदारही मानलं जात आहे. सुनक हे २०१५ मध्ये पहिल्यांदा रिचमंड मतदारसंघातून ब्रिटीश संसदेत निवडून आले होते. सुनक २०१७ मध्ये पुन्हा निवडून आले होते. सुनक यांचे लग्न इन्फोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायण मूर्ती आणि लेखिका सुधा मूर्ती यांच्या कन्या अक्षता मूर्तीशी झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com