दिलासादायक! हॉस्पिटलमध्ये दाखल न केलेल्यांच्या शरीरात आपोआप तयार होतेय सेल्युलर इम्युनिटी

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 5 November 2020

विविध ठिकाणी सध्या कोरोनावरील लशींवर संशोधन आणि निर्मितीचं काम सुरु आहे.

लंडन: जगभरात कोरोना कहर अजून सुरुच आहे. सध्या सगळ्यांना आस आहे ती कोरोना लशींची. विविध ठिकाणी सध्या कोरोनावरील लशींवर संशोधन आणि निर्मितीचं काम सुरु आहे. काही दिवसांपुर्वी ब्रिटनमध्ये झालेल्या एका वैज्ञानिक संशोधनात असं दिसून आलं आहे की, एखाद्याला कोरोना संसर्ग झाला तर त्याच्या शरीरात या रोगाविरुद्ध अल्पकालीन प्रतिकारशक्ती तयार होत असते.

एकदा बाधा झाली की T cellचं प्रमाण वाढत आहे-
यूके कोरोनाव्हायरस इम्युनॉलॉजी कन्सोर्शियम (UK-CIC), पब्लिक हेल्थ इंग्लंड आणि मँचेस्टर युनिव्हर्सिटी एनएचएस फाउंडेशन ट्रस्टच्या (Public Health England and Manchester University NHS Foundation) यांच्या संयुक्त ताज्या संशोधनात असं दिसून आलं की, SARS-CoV-2 म्हणजे कोरोनाची बाधा झाल्यानंतर शरीरात टी सेल (T cell) तयार होत असतात. टी सेल आपल्या शरीराची सुरक्षा करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या असतात.

US Election: बायडन यांनी मोडले ओबामा पासून ते क्लिंटनपर्यंतचे सर्व विक्रम

100 कोरोना रुग्णांवर संशोधन-
UK-CICचा अभ्यासाचा एक भाग म्हणून यामध्ये बर्मिंगहॅम विद्यापीठ, पब्लिक हेल्थ इंग्लंड, मँचेस्टर युनिव्हर्सिटी बीएनएचएस फाउंडेशन ट्रस्ट (MFT)आणि एनआयएएचआर मँचेस्टर क्लिनिकल रिसर्च फॅसिलिटीच्या संशोधकांनी 2 हजार पेक्षा जास्त क्लिनिकल आणि नॉन-क्लिनिकल हेल्थकेअर कामगारांच्या सिरम आणि रक्ताचे नमुने गोळा केले होते. यातील 100 जणांचे कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आले होते. या सर्वांचे सरासरी वय 41 होते. कोरोनावरील झालेल्या अभ्यासात 23 पुरुष तर 77 स्त्रियांचा समावेश होता.

मोठं संशोधन-
कोरोना झालेल्या 100 जणांना कोरोनाची सौम्य/मध्य लक्षणे दिसून आली होती. यामध्ये कुणालाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं नव्हतं. 100 व्यक्तींवर झालेल्या हा अभ्यास जगातील आतापर्यंतच्या मोठ्या अभ्यासांपैकी एक ठरला आहे, अशी माहिती UK CIC ने अधिकृत निवेदनात दिली आहे. हे संशोधन मागील 7 ते 8 महिन्यांपासून सुरु आहे. 

हेही वाचा- US Election Result 2020: भारतीय वंशाचे श्रीनिवास कुलकर्णी पराभूत

आरोग्यदायी राहण्यासाठी आपल्या शरीरात ऍंटीबॉडी हे अतिशय महत्वाचे आहे. या संशोधनामुळे कोरोनावरील लसीच्या निर्मितीमध्ये मोठी मदत झाली आहे. मागील सहा महिन्यांत प्रत्येक व्यक्तींमध्ये टी सेलचा प्रतिसाद वेगवेगळा होता. 

दुसऱ्यादा बाधा झाल्यावर होतोय फायदा-
नैसर्गिकरित्या वाढलेल्या या सेल्युलर इम्युनिटीमुळे (cellular immunity) कोरोनाविरुध्द लढण्यासाठी उपयोगाचं ठरत आहे. जर दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झाली तर तो रुग्ण लगेच कोरोनातून सावरत आहे, असा रिझल्ट या संशोधनातून समोर आला आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UK study finds cellular immunity in Covid cases which non hospitalised