US Election Result 2020: भारतीय वंशाचे श्रीनिवास कुलकर्णी पराभूत

shrinivas kulkarni main.jpg
shrinivas kulkarni main.jpg

वॉशिंग्टन- अमेरिकेतील लोकप्रतिनिधी-गृहाच्या निवडणुकीमध्ये भारतीय अमेरिकी वंशाचे श्रीनिवास राव प्रिस्टन कुलकर्णी यांचा पराभव झाला. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रॉय नेहल्स यांनी त्यांना पराभूत केले. कुलकर्णी हे टेक्सासमधून निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. नेहल्स यांना 52 टक्के मते मिळाली तर कुलकर्णी यांच्या पारड्यामध्ये 44 टक्के मते पडली. कुलकर्णी हे माजी राजनैतिक अधिकारी असून त्यांनी 14 वर्षे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यामध्ये नोकरी केली होती.  

लुसियानामध्ये जन्मलेले श्रीनिवास कुलकर्णी (41) निवडणूक जिंकले असते तर ते टेक्सास मतदारसंघातून निवडून गेलेले पहिले आशियाई-अमेरिकन ठरले असते.

दरम्यान, भारतीय वंशाच्या अमेरिकन सदस्य प्रमिला जयपाल या सलग तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. चेन्नईत जन्म झालेल्या 55 वर्षीय जयपाल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार होत्या. त्यांनी वॉशिंग्टन राज्यातील सातव्या काँग्रेस मतदारसंघातून रिपब्लिक पक्षाच्या क्रेग केल्लर यांचा 70 टक्के मतांनी पराभूत केले आहे. 

जयपाल यांनी जम्मू-काश्मीरविषयीच्या भारताच्या धोरण आणि सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) यावर यापूर्वी टीका केली आहे.

हे ही होते मैदानात...


ग्रीन पार्टीचे उमेदवार होवी हॉकिन्स आणि लिबर्टेरियन पक्षातर्फे जो जॉर्जरसन हे उमेदवारही अध्यक्षपदासाठी यंदा रिंगणात होते. मात्र, बड्यांच्या लढतीत त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. त्यांना मिळून सव्वा टक्केही मते पडली नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com