इराणने केलेली ती चूक अमेरिकेनीही केली होती; पाहा कोणती... 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 January 2020

अमेरिकन नेव्हीने इराणचे प्रवासी विमान पाडले होते. त्यामध्ये 290 नागरिक मारले गेले होते. यावेळी इराणचे इअर फ्लाईट 655 प्लेन अमेरिकेकडून पाडले गेले होते.

न्यूयाॅर्क : युक्रेनचे पॅसेंजर विमान मिसाईलने पाडल्याप्रकरणी इराणने आता आपली चूक मान्य केली आहे. इराणने सांगितले की, त्यांच्याकडून चुकून प्रवासी विमान पाडले गेले. या केलेल्या हल्यामध्ये 176 पॅसेंजर मारले गेले. या अगोदर इराण हा हल्ला त्यांनी केल्याचे स्वीकारणे टाळत होता. परंतू त्यांनी आता चूक झाल्याचे मान्य केले आहे.

Video : इराणचा अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला; कासीम सुलेमानींच्या हत्येचा घेतला बदला

हा ह्ल्ला इराणनेच केल्याचा दावा अमेरिकेने केला होता. अमेरिकेने केलेल्या दाव्यात तथ्य नसल्याचे इराणचे मत होते. त्यानंतर इराणचे राष्ट्रपती हसन रूहानी म्हणाले, की जगाने हे देखील विसरू नये की 1988 मध्य़े अमेरिकन नेव्हीने इराणचे प्रवासी विमान पाडले होते. त्यामध्ये 290 नागरिक मारले गेले होते. यावेळी इराणचे इअर फ्लाईट 655 प्लेन अमेरिकेकडून पाडले गेले होते.

'अण्वस्त्रे तयार केली तर बघाच!'; ट्रम्प इराणवर भडकले

रूहानी यांनी अमेरिकेवर टीका करताना सांगितले, 52 नंबरबद्दल बोलणाऱ्यांनी 290 नंबर देखील विसरू नये. 52 नंबर असा उल्लेख डोनाल्ड ट्रंप यांनी केला होता. इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांच्यावर हल्ला करून ठार केल्यानंतर अमेरिकेने इराणला धमकी दिली होती की, जर इराणने हल्ला केला तर त्यांच्या 52 जागांवर हल्ला केला जाईल. यावरून इराण आणि अमेरिका संघर्ष पुढी काळात वाढू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ukrain plane crash america did same mistake like iran in 1988 amrican navyship shot down iranian passenger plane