Ukraine Russia War : किव्हमध्ये टीव्ही टॉवरवर हवाई हल्ला; ५ जणांचा मृत्यू

Ukraine Russia War : किव्हमध्ये टीव्ही टॉवरवर हवाई हल्ला; ५ जणांचा मृत्यू

युक्रेन-रशियामध्ये गेल्या सहा दिवसांपासून युद्ध सुरूच आहे. या दोन्ही देशांमध्ये काल शांतता चर्चा पार पडली. पण, युद्ध काही थांबेना. रशियानं पाचव्या दिवशी ५६ रॉकेट आणि ११३ क्रूझ क्षेपणास्त्र डागले. याबाबत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी माहिती दिली.

किव्हमध्ये वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताचे दूतावास रिकामे करण्यात आले आहे. अनेक अधिकारी कँप ऑफिसमध्ये शिफ्ट झाले असल्याची माहिती भारत सरकारने दिली आहे.

युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केली. याबाबत चार्ल्स यांनी ट्विटवरून माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर की, निर्दोष नागरिकांवर रशियाने बेछूट गोळीबार केल्यानं खार्किव्हमध्ये भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.

रशियाने टीव्ही टॉवरवर केलेल्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त एएफपी वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

युक्रेनमध्ये टीव्ही प्रसारण बंद

रशियाने युक्रेनची राजधानी किव्हवर हल्ला केला आहे. किव्हमधील टीव्ही टॉवरवर हवाई हल्ला केल्यानंतर युक्रेनमधील टीव्ही चॅनेलचे प्रसारण बंद झाले आहे.

Ukraine Russia War : किव्हमध्ये टीव्ही टॉवरवर हवाई हल्ला; ५ जणांचा मृत्यू
अणु युद्धातून वाचवेल अशा अंडरग्राउंड सिटीत पुतीन यांचे कुटुंबिय?

आठवड्याभरात विद्यार्थ्यांना आणण्यासाठी भारतातून ३१ विमाने जाणार

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी २ ते ८ मार्च या कालावधीत ३१ विमाने पाठवण्यात येतील. २ मार्चला ८ विमाने जाणार असून यात हवाई दलाच्या विशेष विमानाचा समावेश असेल.

दोन्ही देशांनी भारतीयांची सुरक्षा राखली जावी

रशियाने केलेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एकदा उच्च स्तरीय बैठक घेतली. तर भारताने रशिया आणि युक्रेनला भारतीयांची सुरक्षा अबाधित रहावी असं सांगितलं आहे.

Ukraine Russia War : किव्हमध्ये टीव्ही टॉवरवर हवाई हल्ला; ५ जणांचा मृत्यू
'युद्धाच्या झळा युक्रेन सोसतंय, तुम्ही...' ब्रिटन PM समोर महिला पत्रकाराला अश्रू अनावर

रशियन सैन्याने युक्रेनमधील दुसरं सर्वात मोठं शहर खार्किवमध्ये मंगळवारी हल्ला केला. यासह रशियन सैन्य युक्रेनची राजधानी किव्हच्या आणखी जवळ पोहोचले आहे. जवळपास ४० मैल ताफ्यात रशियन रणगाडे आणि इतर सैनिकी वाहनांचा समावेश आहे.

EU च्या सदस्यत्वासाठी युक्रेनचा अर्ज स्वीकारला

युरोपीयन संघाच्या सदस्यत्वासाठी युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी अर्ज केला होता. युक्रेनचा अर्ज स्वीकारण्यात आला असून युरोपियन संसदेत मंजुरी देण्यात आली आहे. आता यावर विशेष प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अधिकृतपणे युरोपियन संघाचे सदस्यत्व युक्रेनला मिळेल.

रशियाने युक्रेनमधील मारियुपोल शहरावर ताबा मिळवला आहे. रशियन सैन्याने हल्ल्यानंतर युक्रेनच्या प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या मारियुपोलमधील वीज बंद केली आहे.

Ukraine Russia War : किव्हमध्ये टीव्ही टॉवरवर हवाई हल्ला; ५ जणांचा मृत्यू
Photos : युक्रेनच्या लढवय्याने युरोपियन संसदेतही जिंकली मनं

आम्ही स्वातंत्र्याची लढाई लढत आहे. आमच्यासाठी, प्रत्येक युक्रेन नागरिकासाठी, देशासाठी एक वाईट घटना असल्याचं झेलेन्स्की म्हणाले.

युक्रेनचे नागरिक हल्ल्याची किंमत मोजत आहेत. आपल्या स्वातंत्र्याच्या या लढ्याला सर्व देशांकडून पाठिंबा मिळत असल्याचंही झेलेन्स्कींनी युरोपीयन युनियनच्या संसदेत बोलताना सांगितलं.

आमच्या अजूनही सोव्हिएत आण्विक तंत्रज्ञान आहे. त्यामुळे युद्धाच्या धोक्याला उत्तर देण्यात आम्हाला अपयश मिळू शकत नाही, असं रशियाचे परराष्ट्र मंत्री सेरगई लॅव्हरोव्ह म्हणाले. याबाबत रॉयटर्सनं वृत्त दिलं आहे.

भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

युक्रेनमधील खार्किव येथे आज सकाळी झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालय त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे.

हंगेरीवरून विमान दिल्लीत दाखल -

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन विमान हंगेरीहून दिल्लीत आले. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी परतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांना आश्वासन दिले की, युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

रशियाने युक्रेनच्या खैरीव येथील सरकारी मुख्यालयावर हवाई हल्ला केला. यामध्ये हे मुख्यालय उद्धवस्त झाले.

विद्यार्थ्यांनो तत्काळ कीव्ह सोडा : भारतीय दूतावास

युक्रेनमधील भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांना आज तातडीने कीव सोडण्याचा सल्ला दिला आहे. मिळेत त्या वाहनाने कीव्ह सोडा, असं आवाहन भारतीय दूतावासाने केलं आहे.

रशियन सैनिकांनी कीव्हमधील प्रसूती रुग्णालयावर गोळीबार केल्याची माहिती रुग्णालयाचे सीईओ विटाली गिरिन यांनी दिलीय.

मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची भेट घेतली आणि त्यांना युक्रेनसह विविध मुद्द्यांवर माहिती दिली, असं वृत्त एएनआयनं दिलं आहे.

लष्करी तळावर हल्ला, ७० युक्रेनियन सैनिक ठार -

रशियन तोफखान्याने पूर्व युक्रेनमधील लष्करी तळावर हल्ला केला असून 70 हून अधिक युक्रेनियन सैनिक ठार झाले असं वृत्त स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं असोसिएटेडे प्रेसनं दिलं आहे.

रशियाकडून बॉम्ब हल्ले -

रशियाने युक्रेनमधील रहिवासी भागांवर बॉम्ब फेकले. तसेच सर्वात मोठ्या लष्करी ताफ्याने कीव्हला वेढा घातला आहे.

आस्ट्रेलियाची युक्रेनला मदत -

ऑस्ट्रेलियाने युक्रेनला 75 दशलक्ष डॉलर्स मदत करण्याचे वचन दिले आहे. यापैकी 50 दशलक्ष डॉलर्स संरक्षण सहाय्यासाठी आणि 25 दशलक्ष डॉलर्स इतर मदतीसाठी असेल.

बल्गेरिया, पोलंड, स्लोव्हाकियाची युक्रेनला मदत -

बल्गेरिया, पोलंड, स्लोव्हाकिया युक्रेनला मदत करण्यासाठी लढाऊ विमाने पाठवण्यात आले आहेत. बल्गेरिया, पोलंड आणि स्लोव्हाकियाकडून महत्त्वपूर्ण लष्करी हवाई मदत मिळाली असल्याचे युक्रेनियन खासदार वर्खोव्हना राडा यांनी सांगितले. ७० पेक्षा अधिक विमाने, मिग-२९, एसयू-२५, बल्गेरिया (मिग-29), 16 pc बल्गेरिया (एसयू-25), 14 जम पोलंड (मिग-29), 28 pc स्लोव्हाकिया (मिग-29) इतकी लढाऊ विमाने आमच्या सैन्यात सामील झाल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली.

रोमानियातून सातवे विमान भारतात दाखल -

युक्रेनमध्ये अडकलेल्या १८२ भारतीय नागरिकांना घेऊन सातवे विमान ऑपरेशन गंगाअंतर्गत बुखारेस्ट (रोमानिया) येथून मुंबईत पोहोचले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई विमानतळावर भारतीय विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

कॅनडा युक्रेनला शस्त्र पुरवणार -

कॅनडा युक्रेनला शस्त्रे पुरवणार आहे. तसेच रशियन कच्च्या तेलाच्या आयातीवर बंदी घालणार आहे. रशियानं युक्रेनवर केलेल्या कारवाईच्या निषेध म्हणून कॅनडानं हा निर्णय घेतला आहे.

युक्रेनची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव -

युक्रेनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली असून सुनावणीची मागणी केली आहे. तसेच रशियाला सर्व लष्करी कारवाया त्वरित थांबवण्याचे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com