नेटफ्लिक्स, टिकटॉकसह अनेक कंपन्यांची रशियातून माघार; सेवा देणे केले बंद

नेटफ्लिक्स, टिकटॉकसह अनेक कंपन्यांची रशियातून माघार; सेवा देणे केले बंद

रशिया युक्रेन युध्द (Ukraine Russia War) चांगलेच पेटले आहे. युक्रेनवर आक्रमणाबाबत अनेक जागतिक कंपन्यानी रशियाविरोधी धोरण स्विकारल्याचे पाहायला मिळत आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे अनेक पाश्चात्य कंपन्यांना रशियात सेवा देण्याबाबत विचारात करत आहेत. तर यासोबतच काहींनी देशातील कामकाज काही काळ स्थगित करण्याचा, तर काहींनी संपूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

आता या कंपन्यांच्या करमणूक क्षेत्रातील व्हिडीओ स्ट्रिमींग क्षेत्रात दिग्गज असलेली कंपनी Netflix आणि TikTok यांनी देखील घोषणा केली की, ते रशियामधील त्यांच्या सेवा देणे स्थगित करत आहेत. युक्रेन वर झालेल्या आक्रमणामुळे या कंपन्यांनी रशियामध्ये स्थगितीचा निर्णय घेतला आहे

युक्रेनमधील ग्राऊंड रियालिटी पाहाता हा निर्णय घेतल्याचे नेटफ्लिक्सच्या प्रवकत्याने सांगितले तर, TikTok कडून सांगण्यात आले आहे की, त्याच्या लोकप्रिय सोशल मीडिया App चे रशियन वापरकर्ते यापुढे नवीन व्हिडिओ किंवा लाइव्हस्ट्रीम पोस्ट करू शकणार नाहीत आणि ते जगातील इतरत्र शेअर केलेले व्हिडिओ देखील पाहू शकणार नाहीत. सेवा स्थगित केल्यानंतरही, कंपनीने सध्याच्या वापरकर्त्यांच्या खात्यांचे काय होईल किंवा या निर्णयाचा फेरविचार केव्हा होईल या बद्दल माहिती दिलेली नाही.

नेटफ्लिक्स, टिकटॉकसह अनेक कंपन्यांची रशियातून माघार; सेवा देणे केले बंद
'पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का?', पाश्चिमात्य देशांवर इम्रान खान भडकले!

या दरम्यान, गेल्या आठवड्यात Apple आणि मायक्रोसॉफ्ट या दोघांनी रशियामध्ये त्यांची उत्पादने विकणे बंद केले, PayPal ने जाहीर केले की ते त्यांच्या सेवा स्थगित करत आहेत आणि सॅमसंगने देखील त्यांच्या सर्व उत्पादनांची देशात शिपमेंट बंद केली आहे. इतकेच नाही तर वीजा इंक. (Visa Inc.) आणि मास्टरकार्ड इंक. (Mastercard Inc.) ने रशियामधील सर्व व्यवहार बंद केले आहेत.

अनेक टेक कंपन्या देखील रशियन चुकीच्या माहितीच्या प्रसारा विरोधात कारवाई करत आहेत, Google, TikTok, Facebook आणि Microsoft या सर्वांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर RT News सारख्या रशियाच्या सरकारी नेटवर्कना बंदी घातली आहे.

नेटफ्लिक्स, टिकटॉकसह अनेक कंपन्यांची रशियातून माघार; सेवा देणे केले बंद
युक्रेनविरोधात रशियाचा नवा डाव; लढण्यासाठी सिरियन सैनिकांना देणार 300 डॉलर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com