'झेलेन्स्कींसोबत थेट चर्चा करा', PM मोदींचा पुतिन यांना सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi Talked To Vladmir Putin

'झेलेन्स्कींसोबत थेट चर्चा करा', PM मोदींचा पुतिन यांना सल्ला

रशिया-युक्रेन युद्धाचा (Ukraine Russia War) आज १२ वा दिवस आहे. आज पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. जवळपास ५० मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. तसेच युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबत थेट चर्चा करण्याचा सल्ला देखील मोदींनी पुतिन यांना दिला.

हेही वाचा: मोदींची झेलेन्स्कींसोबत ३५ मिनिटं चर्चा; मदतीसाठी मानले आभार

नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रशियानं तात्पुरता युद्धविराम घोषित केला आहे. या निर्णयाचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. तसेच सुमीमधून भारतीय नागरिकांना लवकरात लवकर सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी जोर दिला. विद्यार्थ्यांना काहीही होणार नाही, याची काळजी घेण्याची विनंती पुतिन यांना केली. त्यानंतर भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं आश्वासन पुतिन यांनी मोदींना दिलं. तसेच रशिया युक्रेन युद्धामधील सध्याच्या हालचालींबाबत देखील मोदींना माहिती दिली, असं वृत्त एएनआयनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.

मोदींची झेलेन्स्की यांच्यासोबतही चर्चा -

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींनी रशियासोबत चर्चा करण्याची विनंती केली होती. तसेच आज पंतप्रधान मोदींनी झेलेन्स्की यांच्यासोबत देखील चर्चा केली. युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर पडू देण्याची विनंती मोदींनी यावेळी केली. तसेच मदतीसाठी आभार देखील मानले.

रशिया-युक्रेनमधील युद्ध थांबवण्याचं नाव घेत नाही. आज बाराव्या दिवशी काही शहरं वगळता युद्ध सुरूच आहे. रशियानं युक्रेनियन लष्कराचे तळ उद्धवस्त केले असून रहिवासी भागांवर देखील हल्ले केले आहेत. यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा समावेश असून एका विद्यार्थ्याला गोळी लागली होती. या युद्धामुळे युक्रेनच्या ५ लाख लोकांनी देश सोडून पाश्चिमात्य देशांकडे धाव घेतली आहे.

Web Title: Ukraine Russia War Pm Modi Talked With Vladmir Putin

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top