रशियाचे अमेरिकेला प्रत्युतर; राष्ट्राध्यक्षांसह अनेकांवर घातली बंदी

Ukraine Russia war russia sanctions joe biden and other top us govt officials
Ukraine Russia war russia sanctions joe biden and other top us govt officials Sakal

युक्रेनवर हल्ला केल्याबद्दल अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी रशियावर कडक निर्बंध लादले आहेत. यानंतर रशियानेही प्रत्युत्तर देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि हिलरी क्लिंटन यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अमेरिकन अधिकाऱ्यांवर निर्बंध लादले आहेत.

13 जणांच्या यादीत संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन, सीआयए प्रमुख विल्यम बर्न्स, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन, माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन आणि इतर अधिकाऱ्यांची नावे आहेत. रशियाकडून हा निर्णय अमेरिकेने याआधी रशियन अधिकार्‍यांवर लादलेल्या निर्बंधांच्या प्रतिसादात घेण्यात आला आहे.

युक्रेन आणि रशियन सैन्य यांच्यातील युद्ध संपताना दिसत नाहीये, युद्धाच्या 20 व्या दिवशी, रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ले सुरुच ठेवले आहेत. दरम्यान या युध्दात युक्रेनमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे तर अब्जावधींच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. लाखो लोक देश सोडून गेले आहेत. अशा स्थितीत संतप्त अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले. रशियानेही प्रत्युत्तर देत अमेरिकेवर निर्बंध लादले आहेत.

Ukraine Russia war russia sanctions joe biden and other top us govt officials
एलन मस्कचं थेट पुतीन यांना 'वन-ऑन-वन' युध्दाचं आव्हान, म्हणाले..

रशियन मीडिया स्पुतनिकने व्लादिमीर पुतिन यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, रशियाने अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन आणि इतर उच्च अमेरिकी सरकारी अधिकाऱ्यांवर निर्बंध लादले आहेत. रशियाकडून अमेरिकेविरुद्धची ही कारवाई असल्याचे मानले जात आहे.

रशियावर अमेरिकेची कारवाई

यापूर्वी अमेरिकेने रशियाकडून तेल, वायू आणि ऊर्जा आयातीवर बंदी घातली होती. तत्पूर्वी, अमेरिका, युरोपियन युनियन आणि यूके यांनी मिळून काही रशियन बँकांना SWIFT जागतिक आर्थिक संदेश प्रणालीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि अनेक निर्बंध लादले.

Ukraine Russia war russia sanctions joe biden and other top us govt officials
देशाच्या 136 कोटी लोकसंख्येत करदाते किती? अर्थमंत्र्यांनी दिली माहिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com