Apple चा रशियाला मोठा झटका, अनेक उत्पादनांची विक्री केली बंद

Apple
Applegoogle

Ukraine Russia War : रशिया युक्रेनमधील युद्धाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. अनेक देशांकडून रशियावर निर्बंध लादले जात आहेत. या दरम्यान दिग्गज टेक कंपनी ॲपल (Apple) ने देखील रशियामध्ये आपल्या उत्पादनांची विक्री थांबवली आहे. कंपनीकडून ही माहिती दिली आहे. यापूर्वी कंपनीने रशियामध्ये ॲपल पे (Apple Pay) च्या सेवेवर बंदी घातली होती. तसेच ॲपलने रशियाचे न्यूज ॲप्स आरटी (RT) आणि स्पुतनिक ॲप (Sputnik App) देखील त्यांच्या App स्टोअरमधून काढून टाकले आहेत.

कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, ॲपलने रशियामधील सर्व विक्री चॅनेलवर निर्यात थांबवली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि आणि बाधित देशांच्या सरकारशी चर्चा करत आहेत.

गेल्या आठवड्यात युक्रेनचे उपपंतप्रधान मायखाइलो फेडोरोव्ह यांनी ॲपलला एक पत्र लिहिले होते, ज्यामध्ये त्यांनी रशियाला कंपनीची उत्पादने, सेवा आणि ॲप स्टोअरमधून काढून टाकण्याची मागणी केली होती. ते म्हणाले की, अशा हालचालीचा तरुणांवर परिणाम होईल आणि रशियाचे लोक त्यांच्या सैन्याच्या धोरणांना विरोध करतील. ॲपलच्या निर्णयानंतर मायखाइलो फेडोरोव्ह यांनी ट्विट करून रशियामध्ये ॲपलच्या उत्पादनांची विक्री थांबवल्याची माहिती दिली. तसेच App Store चा एक्सेस देखील बंद करण्याची मागणी केली.

Apple
"माझे शब्द लिहून घ्या..बाप बेटा जेल जायेंगे"; संजय राऊतांच ट्विट

गुगनेही बंद केली सर्व्हिस

ॲपलने आपल्या निवेदनात ॲप स्टोअरबद्दल जास्त माहिती दिलेली नाही. मात्र, कंपनीने युक्रेनमधील Apple Maps चे ट्राफिक आणि लाइव्ह इंसिडन्ट फीचर डिसेबल केले आहे. ॲपलच्या आधी गुगलने देखील असेच पाऊल उचलले आहे. Google ने युक्रेनमधील Google Maps वाहतूक डेटा देखील बंद केला आहे.

Apple
LPG Price : LPG सिलिंडर आजपासून महाग, द्यावे लागणार 105 रुपये जास्त

ॲपलचे म्हणणे काय?

ॲपलने म्हटले की, 'रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे आम्ही चिंतेत आहोत आणि या हिंसाचाराचा सामना करणाऱ्या सर्वांच्या पाठीशी उभे आहोत. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही अनेक पावले उचलली आहेत. गेल्या आठवड्यात आम्ही रशियाच्या सर्व सेल चॅनेल्सची निर्यात थांबवली आहे. Apple Pay आणि इतर सेवा देखील मर्यादित केल्या आहेत.

'RT News आणि Sputnik News देखील यापुढे रशियाच्या बाहेर देखील ॲप स्टोअरवर उपलब्ध नसतील. आम्‍ही युक्रेनमध्‍ये Apple Maps ची ट्राफिक आणि लाइव्ह इंसिडन्ट फीचर युक्रेनमध्ये बंद केले आहेत.

कंपनीने सांगितले की आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि संबंधित सरकारांशी चर्चा करत आहोत. तसेच कंपनीने आम्ही जगभरातील ज्यांना शांतता हवी आहे अशा सर्व लोकांसोबत आहोत असे म्हटले आहे.

Apple
Jio Prepaid Plan : जिओचे दररोज 1GB डेटा प्लॅन, किंमती 149 पासून सुरु

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com