शांततेनं तोडगा काढू, रशिया-युक्रेन युद्ध त्वरित थांबवा : झेलेन्स्की

Volodymyr Zelensky
Volodymyr Zelenskyesakal
Summary

रशियन सैन्य आता मुख्य ध्येय गाठण्याच्या तयारीत आहे.

रशियाचे युक्रेनवरील हल्ले (Russia Ukraine War) सुरूच आहेत. रशिया-युक्रेन युद्धाचा 30 वा दिवस आहे. गेल्या महिन्याभरापासून दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरूच आहे. युक्रेनच्या विविध भागांवर रशियानं केलेल्या भीषण हल्ल्यांमुळं मोठं नुकसान होत आहे. युक्रेनमधील लाखो रहिवासी देश सोडून इतरत्र स्थलांतरित झाले आहेत. अद्यापही रशिया युद्ध थांबवायला तयार नाही. युक्रेनही जोरदार प्रत्युत्तर देत असून, माघार घेण्यास कोणताही देश तयार नाही. यातच आता रशियाला ९ मेपर्यंत युद्ध सुरू ठेवायचे आहे, असा मोठा दावा युक्रेनकडून करण्यात आलाय.

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी रशियाला युद्ध संपवण्यासाठी पुन्हा वाटाघाटी करण्याचं आवाहन केलंय. युक्रेन शांततेसाठी कोणतेही प्रयत्न करेल, पण आपलं क्षेत्र सोडणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. झेलेन्स्की शुक्रवारी रात्री राष्ट्राला दिलेल्या व्हिडिओ संबोधनात रशियन जनरल स्टाफचे उपप्रमुख सर्गेई रुडस्कोई (Sergei Rudas Koi) यांना उत्तर देताना दिसले.

Volodymyr Zelensky
'आप'च्या आमदारानं शब्द पाळला; एक रुपया पगार घेणार, पेन्शनही सोडली

रुडस्कोई म्हणाले, रशियन सैन्य (Russian Army) आता मुख्य ध्येय गाठण्याच्या तयारीत आहे. डोनबासवर रशियन सैन्यानं (Russian Military) लक्ष केंद्रित केलं असून ते लवकरच आपलं ध्येय गाठतील. रशिया व फुटीरतावाद्यांनी 2014 पासून पूर्व युक्रेनच्या डोनबास प्रदेशाचा काही भाग नियंत्रित केलाय. सध्या रशियन सैन्य युक्रेनमधील मारियुपोल शहरासह अधिक प्रदेश ताब्यात घेण्यासाठी लढा देत आहे. झेलेन्स्की यांनी सांगितलं की, रशियन सैन्यानं हजारो सैनिक गमावले आहेत. परंतु, तरीही ते कीव किंवा खार्किव्ह ताब्यात घेऊ शकलं नाही, असं त्यांनी नमूद केलं.

Volodymyr Zelensky
कर्नाटक सरकार टिपू सुलतानचे धडे बदलणार

हंगेरीच्या (Hungary) पंतप्रधानांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी युक्रेनला शस्त्रास्त्रं पुरवण्याचे आणि रशियाच्या ऊर्जा क्षेत्रावर निर्बंध लादण्याचे भावनिक आवाहन नाकारल्याचं वृत्त आहे. पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय, झेलेन्स्की यांची विनंती हंगेरीच्या हिता विरुद्ध आहे असून रशियाच्या ऊर्जेवर निर्बंध लादणं म्हणजे, हंगेरीची अर्थव्यवस्था मंदावेल, असं त्यांचं म्हणणं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com