Climate Change : UN ने स्वीकारला सायकलला प्रोत्साहन देण्याचा ठराव

तुर्कमेनिस्तानने प्रस्तावित केलेला ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
Cycling
Cycling esakal

हवामान बदलाचा सामना करण्यासाठी सायकलला पाठिंबा देणारा ठराव संयुक्त राष्ट्र (United Nation )महासभेच्या 193 सदस्यांनी मंगळवारी मंजूर केला आहे. तुर्कमेनिस्तानने प्रस्तावित केलेला ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून, सर्वसाधारण सभेच्या सर्व ठरावांप्रमाणेच तो बंधनकारक नाहीये. दरम्यान, विकसनशील आणि विकसित देशांमध्ये शहरी आणि ग्रामीण सेटिंग्जमध्ये सार्वजनिक वाहतुकीमध्ये सायकली एकिकृत करण्यासाठी आवाहन सदस्य राष्ट्रांना करण्यात आले आहे. याबाबत एनडीटिव्हीने वृत्त प्रकाशित केले आहे. (UN Adopts Resolution Promoting Bicycles To Combat Climate Change)

Cycling
वन रँक वन पेन्शन धोरण कायम राहणार : सर्वोच्च न्यायालय

सुधारित रस्ता सुरक्षेद्वारे सायकलिंग आणि बाईक राइडिंगला प्रोत्साहन देण्याच्या ठरावामुळे हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासह शाश्वत विकास साध्य करण्यात मदत होणार आहे. सायकल शेअरिंग सेवांसह क्रॉस-कटिंग विकास धोरणांमध्ये सायकल चालविण्याकडे विशेष लक्ष देण्यास तसेच आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि उपराष्ट्रीय विकास धोरणे आणि कार्यक्रमामध्ये सदस्य राष्ट्रांना प्रोत्साहित करत असल्याचे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com