esakal | नववर्ष दिनी सर्वाधिक जन्म भारतात; चीनलाही मागं टाकल्याची UNICEF ची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

children in world.

2021 मध्ये युनिसेफच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाले आहेत.

नववर्ष दिनी सर्वाधिक जन्म भारतात; चीनलाही मागं टाकल्याची UNICEF ची माहिती

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्राच्या UNICEF ने दिलेल्या माहितीनुसार, 2021 या नवीन वर्षाच्या सुरवातीला जगभरात 3,71,500 हून अधिक मुलांचा जन्म झाला आहे. यामध्ये सर्वात अधिक म्हणजेच 60 हजारहून अधिका मुलांचा जन्म हा भारतात झाला आहे.  युनिसेफने म्हटलं की जगभरात नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी 3,71,504 मुलांचा जन्म झाला आहे. 2021 च्या पहिल्या मुलाचा जन्म फिजी आणि शेवटच्या मुलाचा जन्म अमेरिकेत झाला आहे.

युनिसेफने म्हटलं की, जगभरात या जन्मलेल्या मुलांच्या जवळपास अर्धी लोकसंख्या 10 देशांतीलच आहे. त्यामध्ये भारत (59,995), चीन (35,615), नाइजेरिया (21,439), पाकिस्तान (14,161), इंडोनेशिया (12,336), इथियोपिया (12,006), अमेरिका (10,312), इजिप्त (9,455), बांग्लादेश (9,236) आणि कांगो गणराज्य (8,640) या देशांचा समावेश आहे. या दहा देशांपैकी सर्वाधिक मुले भारतात जन्मलेली आहेत. युनिसेफने म्हटलं की 2021 मध्ये 1.40 कोटी मुलांचा जन्म झाल्याचा अंदाज आहे. आणि त्यांचे सरासरी वय 84 वर्षे राहण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - ब्रिटनमध्ये देशव्यापी लॉकडाऊन जाहीर; कोरोना संक्रमणाचा वाढला कहर

युनिसेफचे डायरेक्टर हेनरीटा फोरने सर्व देशांना 2021 च्या मुलांना भेदभाव विरहीत, सुरक्षित आणि आरोग्यदायी बनवण्याचे आवाहन केलं. त्यांनी म्हटलं की, आजच्या दिवशी जन्मलेली मुले ही मागच्या वर्षी जन्मलेल्या मुलांहून वेगळ्या जगात आलेली आहेत. नवे वर्ष त्यांना नव्या संधी घेऊन आले आहे. 2021 मध्ये युनिसेफच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने युनिसेफ आणि त्याच्या सहकारी संस्था संघर्ष, आजार आणि मुलांच्या आयुष्य जगण्याच्या अधिकाराच्या संरक्षणासोबत आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात मुलांसाठी केल्या गेलेल्या कामांचा उत्सव साजरा करेल तसेच या निमित्ताने अनेक कार्यक्रमाचे आयोजन तसेच घोषणा करणार आहे. 

फोर यांनी म्हटलं की, आज जग जागतिक महामारी, अर्थव्यवस्थामध्ये घसरण, वाढती गरीबी आणि असमानतेच्या काळातून जात आहे. अशातच युनिसेफच्या कामाची नेहमीसारखीच गरज आहे. गेल्या 75 वर्षांपासून युनिसेफ संघर्ष, स्थलांतर, नैसर्गिक आपत्ती आणि संकटांमद्ये जगातील लहान मुलांसाठी काम करत आहे. 
 

loading image