
चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूनं सर्वांची डोकेदुखी वाढली आहे. लहान मुलं आणि वयोवृद्धांची या काळात खास काळजी घ्यावी लागणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले होते. याशिवाय प्रसूतीदरम्यान नेमके काय करावे आणि काय टाळावे यासंदर्भातही कोणतीही ठोस माहिती सध्याच्या घडीला उपलब्ध नाही. कोरोनाच्या छायेत भारतात मोठ्या संख्येने नवजात बालकांचा जन्म होणार आहे.
न्यूयॉर्क - चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूनं सर्वांची डोकेदुखी वाढली आहे. लहान मुलं आणि वयोवृद्धांची या काळात खास काळजी घ्यावी लागणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले होते. याशिवाय प्रसूतीदरम्यान नेमके काय करावे आणि काय टाळावे यासंदर्भातही कोणतीही ठोस माहिती सध्याच्या घडीला उपलब्ध नाही. कोरोनाच्या छायेत भारतात मोठ्या संख्येने नवजात बालकांचा जन्म होणार आहे. युनिसेफच्या अहवालानुसार हा आकडा कोट्यवधीच्या घरात आहे. याकाळात बाळाला जन्म देणाऱ्या महिलेसह नवजात बाळाची खबरदारी घेण्याचे नवे आव्हानच असेल.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनाजन्य परिस्थितीत भारतामध्ये तब्बल 2 कोटी अपत्य जन्म घेतील, असा अंदाज युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन फंड (युनिसेफ) ने वर्तवला आहे. मार्चमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू संसर्गजन्य रोग हा जागतिक महासाथ असल्याचे घोषीत करण्यात आले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या या घोषणेनंतर ते या वर्षाच्या अखेरपर्यंत भारतात २ कोटी मुले जन्म घेतील, अशी शक्यता युनिसेफच्या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.
आम्ही तयार; चीनची अमेरिकेला थेट धमकी
जगभरात कोरोना विषाणूचा वेगाने प्रसार होत आहे. या संकटजन्य परिस्थितीत गर्भवती महिला आणि लहान मुलांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन देखील युनिसेफनं केलेय. 10 मे रोजी जागतिक मदर्स डे आहे. यापूर्वी युनिसेफने एक अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार, कोरोनाजन्य परिस्थितीत जगभरात एकून 11.9 कोटी मुलं जन्म घेणार घेतील, अशी आकडेवारी देण्यात आली आहे. 11 मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोविड 19 या संसर्गजन्य जीवघेण्या रोगाला जागतिक महा साथीचा रोग म्हणून घोषीत केले होते. 11 मार्च ते 16 डिसेंबर या काळात एकट्या भारतामध्ये 2 कोटी नवी बालके जन्म घेण्याचे अनुमान युनिसेफनं काढलंय.
धक्कादायक ! गॅस गळतीमुळे ७ जणांचा मृत्यू तर, ५०००हून अधिकांची प्रकृती गंभीर
युनिसेफच्या अहवालानुसार, चीनमध्ये 1.35 कोटी, नायजेरिया 64 लाख, पाकिस्तान 50 लाख आणि इंडोनेशियात 40 लाख बालके जन्म घेतील. जानेवारी ते डिसेंबर 2020 मध्ये भारतात एकूण 2.41 नवजात बालके जन्माला येतील असेही अहवालात म्हटले आहे. कोरोनाच्या वेगाने होणाऱ्या संक्रमाणाच्या संकटजन्य परिस्थितीत प्रसुतीची मोठी समस्या आहे.