esakal | LAC वर एकतर्फी बदल अमान्य; भारताने चीनला सुनावलं
sakal

बोलून बातमी शोधा

LAC वर एकतर्फी बदल अमान्य; भारताने चीनला सुनावलं

LAC वर एकतर्फी बदल अमान्य; भारताने चीनला सुनावलं

sakal_logo
By
सूरज यादव

दुशान्बे (ताजिकिस्तान) - भारत आणि चीन यांच्यात ताजिकिस्तानात झालेल्या शांघाय कार्पोरेशनच्या बैठकीवेळी LAC वरून चर्चा झाली. यामध्ये भारताने चीनला खडे बोल सुनावले आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं की, द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी सीमेवर शांती आणि सोहार्दपूर्ण वातावरण गरजेचं आहे. एकतर्फी बदल आजिबात मान्य केले जाणार नाहीत. या बैठकीवेली वरिष्ठ अधिकारी स्तरावर चर्चेसाठी दोन्ही देशांमध्ये एकमत झालं.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विटरवरून सांगितलं की, चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. बैठकीत कोणत्याही प्रकारे एका बाजुने होणाऱ्या हालचाली मान्य केल्या जाणार नाहीत. दोन्ही नेत्यांमध्ये एससीओ बैठकीशिवाय जवळपास एक तास चर्चा झाली.

हेही वाचा: दहावीचा निकाल लांबणीवर; आठवड्याभरानंतर लागण्याची शक्यता

दहशतवाद आणि कट्टरतावाद यांना आळा घालणे, हाच शांघाय सहकार्य संघटनेचा (एससीओ) मूळ उद्देश असल्याने दहशतवादी कारवायांना मिळणारी आर्थिक रसद तोडणे अत्यंत आवश्‍यक आहे, अशी भूमिका परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज मांडली. ‘एससीओ’च्या परराष्ट्र मंत्री पातळीवरील बैठकीत जयशंकर यांनी भारताची भूमिका मांडली.

ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथे झालेल्या या बैठकीत जयशंकर यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थिती, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरील आशियातील आरोग्यस्थिती, अर्थव्यवस्था याबाबत मते मांडली. या बैठकीला चीन, रशिया, पाकिस्तानसह इतर सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री उपस्थित होते. जयशंकर यांनी, दहशतवादी संघटनांना आळा घालण्यासाठी त्यांना मिळणारे पाठबळ रोखण्याचा आग्रह धरला. तसेच, संसर्गाला आळा घालण्यासाठी ‘एक पृथ्वी एक आरोग्य’ ही भारताची भूमिका सर्वांनी अंगिकारणे आवश्‍यक असल्याचे सांगितले.

loading image