पाकिस्तान-चीनमध्ये धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी; अमेरिकेने दिले कारवाईचे संकेत

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 8 December 2020

सूडान आणि उझ्बेकिस्तानमधील सरकारने देशात आमुलाग्र बदल करत महत्वपूर्ण सुधारणा केली. या आधारावर या राष्ट्रांना विशेष निगरानीच्या सूचितून हटवण्यात आले आहे.

Countries Violating Religious Freedom  : जगातील विविध देशात होत असलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्यावरुन अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तान आणि चीनचाही समावेश असल्याचेही समोर आले आहे. अमेरिकेचे माइक पोम्पिओ यांच्या एका वक्तव्यानुसार,  म्यांमार, इरिट्रिया, ईरान, नायझेरिया, उत्तर कोरिया, सौदी अरेबिया, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानसोबतच पाकिस्तान आणि चीन या राष्ट्रांना धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करणाऱ्या राष्ट्रांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. 

युएनकडून कौतुकाचे उद्गार, ''भारताने करुन दाखवलं, आता जगाचं नेतृत्व करावं''

परराष्ट्र मंत्रालयाने कोमोरोस, क्यूबा, ​​निकारागुआ आणि रशिया या राष्ट्रांची एक विशेष सूची तयारी केली आहे. या देशात धार्मिक स्वातंत्र्याचे गंभीर स्वरुपात उल्लंघन होत असल्याचा उल्लेखही त्यांनी केलाय. ते म्हणाले की, स्वातंत्र्य हा एक अधिकार आहे.  मुक्त समाजासाठी ते गरजेचे आहे. धार्मिक स्वातंत्र्याची गळेचेपी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची तयारी करत आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.  

घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर टीना डाबीची इंस्टाग्राम पोस्ट; व्यक्त केल्या भावना

अल-शबाब, अल-कायदा, बोको हराम, हयात तहरीर अल-शाम, हौथिस, आयएसआयएस, आयएसआयएस-ग्रेटर सहारा, आयएसआयएस-पश्चिम अफ्रीका, जमात नस्र अल-इस्लाम वाल मुस्लिमिन आणि तालिबान या संघटनांचा अमेरिकेने 'विशेष चिंता' गटात समावेश केलाय.  पोम्पेओ म्हणाले की, सूडान आणि उझ्बेकिस्तानमधील सरकारने देशात आमुलाग्र बदल करत महत्वपूर्ण सुधारणा केली. या आधारावर या राष्ट्रांना विशेष निगरानीच्या सूचितून हटवण्यात आले आहे. या राष्ट्रांनी केलेले कायदे आणि घेतलेले धाडसी निर्णय इतर राष्ट्रांसमोर आदर्श निर्माण करणारे आहेत, असा उल्लेखही त्यांनी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US action China and Pakistan among the top 8 countries violating religious freedom