
या हल्ल्याला जबाबदार असलेला एकमेव जिवंत दहशतवादी कसाबला पकडून त्याचा गुन्हा जगासमोर सिद्ध करत त्याला फाशी देण्यात आली होती.
वॉशिंग्टन : मुंबईमध्ये 26/11 रोजी झालेल्या हल्ल्यांला नुकतेच 12 वर्षे पूर्ण झाली. भारतावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत नृशंस असा हल्ला होता. या हल्ल्यात 170 हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते तर 300 हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्याला जबाबदार असलेला एकमेव जिवंत दहशतवादी कसाबला पकडून त्याचा गुन्हा जगासमोर सिद्ध करत त्याला फाशी देण्यात आली होती. या प्रकरणात आता अमेरिकेच्या सरकारकडून लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी साजिद मीरबाबत माहिती देणाऱ्याला 50 लाख डॉलरचे बक्षिस देण्याची घोषणा केली आहे.
हेही वाचा - INDvAUS : अदानींना कर्ज देऊ नका; मॅचदरम्यान मैदानात येऊन तरुणाची बॅनरबाजी
मात्र, पाकिस्तानने प्रतिबंधित केलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या 19 दहशतवाद्यांनी केलेल्या या कारवाईबद्दल मोस्ट वाँटेड टेररीस्टच्या यादीत त्यांना ठेवलं गेलं असलं तरीही त्यांना पकडण्यासाठी काही विशेष प्रयत्न मात्र केले गेले नाहीयेत. तसेच त्या 7 दहशतवाद्यांना शिक्षा करण्यासाठी काही विशेष प्रयत्न केला गेला. भारत देखील या दहशतवाद्याला शोधण्यासाठी गेले अनेक वर्षे प्रयत्न करतो आहे.
REWARD! Up to $5 Million!
On Nov. 26, 2008, terrorists launched a 3-day attack in Mumbai, India that killed more than 170 people.
Help us find the killers.
If you have information, you could be eligible for a reward. https://t.co/79IC2cfhFm pic.twitter.com/smOtc4PXXI
— Rewards for Justice (@RFJ_USA) November 26, 2020
अत्यंत नियोजनबद्ध रितीने हा हल्ला घडवून आणण्यात आला होता.
मुंबईमधील सीएसटी स्टेशन, ताज हॉटेल, नरीमन हाउस, लियोपोल्ड कॅफे या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ले केले होते. दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांचे मनसुबे 'नाकाम' करण्यासाठी पोलिस एनएसजी जवानांना 3 दिवस संघर्ष करावा लागला होता. या दहशतवादी हल्ल्यामध्ये काही जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. एटीएस प्रमुख हेमंत करकरे, एनकाउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख असलेले विजय सालसकर, एसीपी अशोक कामटे आणि तुकाराम ओंबाळे वीरांनी प्राणाची आहुती दिली होती.
हेही वाचा - भारतात तयार होणार रशियाच्या लशीचे 10 कोटी डोस
या नृशंस हल्ल्यात निष्पाप लोक मारले गेले होते. हा हल्ला होऊन
मागच्या 26 नोव्हेंबरला 12 वर्षे पूर्ण झाली. त्या दिवशी एकीकडे जग या हल्ल्याचा निषेध करत मृतांना श्रद्धांजली वाहत होते तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये राजकारणाचा मुखवटा घातलेल्या जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेने मुंबई हल्ल्यात मारल्या गेलेल्या 10 दहशतवाद्यांसाठी आज एक विशेष प्रार्थना सभा ठेवली होती, अशी बातमी आली होती.