'अमेरिकेचा पाठिंबा असलेली राजवट...', इम्रान खान यांचा ताकद दाखवण्याचा प्रयत्न

Imran Khan attack Opposition
Imran Khan attack Oppositione sakal

इम्रान खान यांचे सरकार शनिवारी (Imran Khan Government Collasped) कोसळलं. पण, इम्रान खान अद्यापही माघार घेण्यास तयार नसल्याचं दिसतंय. त्यांच्या समर्थनार्थ रविवारी मोठ्या संख्येने समर्थक रस्त्यावर उतरले होते. इम्रान खान (Imran Khan) यांनी रात्री उशिरा या समर्थकांना धन्यवाद देत अमेरिकेचा पाठिंबा असलेली राजवट बदलण्यासाठी येथील नालायक राजकारण्यांनी प्रयत्न केले, अशी टीका विरोधकांवर केली.

Imran Khan attack Opposition
Pakistan: भारत इतकाच आवडत असेल तर पाकिस्तान सोडा; इम्रान खानवर टीका

इस्लामाबाद (Islamabad), कराची, पेशावर, मलाकंद, मुलतान खानवाल, खैबर, झांग आणि क्वेटा येथे रविवारी इम्रान खान यांच्या पक्षाने प्रचंड निदर्शने केली. विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. परकीय षडयंत्रामुळे त्यांची पंतप्रधानपदावरून हकालपट्टी करण्यात आली, असा आरोप देखील इम्रान खान यांनी केला. त्यांनी रविवारी रात्री उशिरा ट्विट केले. स्थानिक मीर जाफरांनी सत्तेत येण्यासाठी अमेरिकेचे समर्थन असलेली राजवट बदलली. त्याचा निषेध करण्यासाठी हजारो पाकिस्तानी रस्त्यावर उतरले. या सरकारने अनेक गुन्हेगारांना जामिनावर सोडले, असं इम्रान खान म्हणाले.

पाकिस्तानच्या इतिहासात आजपर्यंत नालायक राजकारण्यांच्या विरोधात इतक्या मोठ्या संख्येने लोक कधीच रस्त्यावर उतरले नव्हते. पण, ते आमच्या समर्थनार्थ उतरले, असाही दावा इम्रान खान यांनी केला आहे. इम्रान खान यांच्यानंतर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांचं नाव पाकिस्तानच्या पंतप्रधानपदासाठी पुढे आले आहे. आज होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात त्यांची निवड होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com