

US-China Trade Deal: Tariffs on $60 Billion Goods to Be Reduced
esakal
Which US and Chinese Products Will Get Tariff Relief? :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील अलीकडील शिखर परिषदेनंतर अमेरिका आणि चीनने व्यापार तणाव कमी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. दोन्ही देशांनी सुमारे ६० अब्ज डॉलर मूल्याच्या ‘अ-संवेदनशील’ वस्तूंवरील आयात शुल्क कमी करण्यास सहमती दर्शवली आहे. या निर्णयानुसार अमेरिका आणि चीन प्रत्येकी सुमारे ३० अब्ज डॉलर मूल्याच्या वस्तूंवरील शुल्कात सवलत देणार आहेत. त्यामुळे जागतिक बाजारपेठेतील व्यापार तणाव काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, याचा भारताच्या निर्यातीवर काही प्रमाणात दबाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.