अमेरिकेत कोरोनावर मोनोक्लॉनल अँटिबॉडी थेरपीला मान्यता; ट्रम्प यांच्यावर झालाय वापर

Donald Trump Corona
Donald Trump Corona

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. सध्या युरोपातील अनेक राष्ट्रांत दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अमेरिकेत तर कोरोनाच्या संक्रमणाने थैमान घातले आहे. त्यामुळे अमेरिकेसारख्या प्रगत, विकसित आणि आधुनिक राष्ट्रातदेखील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. अद्याप लशीच्या निर्मितीला आणि तिच्या वितरणाला काही महिने तरी अवकाश आहे. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोरोनावरील उपचारासाठी दिल्या गेलेल्या सिंथेटिक एँटीबॉडी थेरपीचा वापर आता सार्वजनिकरित्या करण्याचा आपत्कालिन निर्णय अमेरिकेच्या प्रशासनाने घेतला आहे. शनिवारी घेतल्या गेलेल्या या निर्णयानंतर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती न करताच कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा उपचार आता शक्य होईल. अमेरिकेच्या फूड एँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशनचे कमिश्नर स्टीफन हान यांनी म्हटलं की, या मोनोक्लॉनल एँटीबॉडी थेरपीला अधिकृत करण्यामुळे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती न करताच उपचार शक्य होईल. यामुळे आमच्यावरील ताण कमी होईल. 

या थेरपीमुळेच डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या महिन्यांत अगदी कमी वेळात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाशी दोन हात केले होते. तसेच आपल्या निवडणूक प्रचारात पुन्हा वापसी केली होती. या थेरपीमध्ये दोन मोनोक्लॉनल एँटीबॉडी REGN10933 आणि REGN10987 चा वापर केला जातो. जो SARS-COV-2 ला इनऍक्टीव्ह करतो. यामध्ये रुग्णाच्या शरीरात त्याच्या पसरण्याची क्षमता कमी होते तसेच रिऍक्शन टाईमदेखील कमी होतो. मोनोक्लॉनल एँटीबॉडी थेरपीमुळे व्हायरसच्या कार्यक्षमेतवर परिणाम होतो. तसेच यामुळे रुग्णाच्या प्रतिकार शक्तीत वाढ होते. याबाबत संशोधकांचं म्हणणं असं आहे की, व्हायरस शरिराचे जास्त नुकसान करण्यापासून रोखण्यासाठी याचा उपयोग होतो. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com