चीनच्या संसर्गाला हरवले म्हणत ट्रम्प यांची पोस्ट; ट्विटरने केली कारवाई

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 12 October 2020

आपण चीनच्या संसर्गाला हरवले असून आता माझ्यापासून कोणालाच कोरोना होणार नाही, असा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

वॉशिंग्टन- आपण चीनच्या संसर्गाला हरवले असून आता माझ्यापासून कोणालाच कोरोना होणार नाही, असा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. यादरम्यान ट्‌विटरवर डोनाल्ड ट्रम्प यांनी डॉक्टरांचा हवाला देत आपण कोठेही जावू शकतो अशा प्रकारची पोस्ट केल्यानंतर ट्विटरने तातडीने कारवाई करत ती पोस्ट वादग्रस्त असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ट्रम्प विरुद्ध ट्विटर याच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे.

सोळाव्या बाळाला जन्म देऊन, आईनं सोडला जीव; बाळाचाही मृत्यू

अमेरिकी निवडणूक जवळ आली असून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांचा प्रचार वेगाने सुरू आहे. दोन आठवड्यापूर्वी ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रचाराला काही प्रमाणात ब्रेक लागला. गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प लष्करी रुग्णालयातून व्हॉइट हाऊस येथे परतले. ते आता पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. 

निवडणुकीतील लढाई लढण्यासाठी आपण सक्षम झालो आहोत, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, चीनच्या धोकादायक संसर्गाला आपण हरवले आहे. आपण उच्च दर्जाच्या चाचण्या आणि परीक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. आपण सध्या चांगल्या स्थितीत असून मला बरे वाटत आहे. संडे मॉर्निंग फ्यूचर्सची संयोजक मारिया बार्तिरोमो यांच्याशी फोनवरून मुलाखत देताना ट्रम्प म्हणाले की, आपण केवळ कोरोनावरच मात केली नाही तर आता मला कोरोना होणार नाही आणि माझ्याकडून त्याचा प्रसारही होणार नाही.म्हणूनच मी न भिता बाहेर येऊ शकतो आणि तेही लवकरच.

Nobel Prize 2020 : अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

ट्रम्प यांच्या पोस्टला ट्विटरचा ‘फ्लॅग’

दरम्यान, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी कोरोना संसर्गासंबंधी एक ट्विट केले होते, मात्र ट्‌विटरने ट्रम्प यांच्या पोस्टला ‘फ्लॅग’ करत चुकीची माहिती देणारी ही पोस्ट असल्याचे सांगितले. त्या ट्‌विटमध्ये म्हटले की, व्हाइट हाऊसच्या डॉक्टरांनी आपल्याला काल तंदुरुस्त असल्याचे सांगितले. याचाच अर्थ की आपल्याला पुन्हा कोरोनाचा संसर्ग होणार नाही आणि माझ्यामुळे दुसऱ्याला होणार नाही. आपण प्रचारसभेत येऊ शकतो. ही बाब डॉक्टरांनी सांगितल्यावर मला खूपच बरे वाटले, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या पोस्टनंतर काही वेळातच ही पोस्ट ट्‌विटरच्या नियमांचा भंग करणारी असल्याचे ट्विटरने जाहीर केले. या ट्विटमध्ये चुकीची माहिती असून यूजरमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या पोस्टला धोकादायक श्रेणीत टाकल्याचे ट्‌विटरने म्हटले आहे. ट्विटर अधिकाऱ्यांच्या मते, अमेरिकी अध्यक्षांच्या पोस्टमधून कोरोनासंदर्भात चुकीची माहिती पसरवली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election president donald trump post on twitter