esakal | जगातील सर्व लोकांना झालाय कोरोना? अमेरिकी तज्ज्ञाचा दावा

बोलून बातमी शोधा

corona people
जगातील सर्व लोकांना झालाय कोरोना? अमेरिकी तज्ज्ञाचा दावा
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभरात पुन्हा वेगानं होत आहे. मोठ्या संख्येनं रुग्णसंख्या वाढली आहे. यामध्ये Pre-symptomatic रुग्णांची संख्या जास्त असून हा चिंतेचा विषय आहे. अमेरिकेच्या तज्ज्ञांनी याबाबत मोठा दावा केला आहे. सध्या Pre symptomatic रुग्णांची संख्या 60 टक्क्यांपर्यंत आहे. यानुसार सगळ्यांनाच कोरोना झालाय असं मानलं पाहिजे. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ कोलरॅडो बाउल्डर आणि कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन एनव्हार्नमेंटल सायन्सेसच्या जोस लुइस जिमिनेज यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, यावेळी जो संसर्ग होत आहे त्यामध्ये 30 ते 59 टक्क्यांपर्यंत Pre Symptomatic रुग्ण आहेत. लक्षणे नसलेल्यांमध्ये इतकं प्रमाण नाही. त्यामुळे ही चिंता करण्यासारखी बाब आहे.

मेडिकल जर्नल लँसेटमध्ये नुकतंच प्रकाशित झालेलं संशोधन लिहिणाऱ्या सहा संशोधकांपैकी जिमिनेज हे एक आहेत. संशोधनात असं म्हटलं आहे की, कोरोना हवेतून पसरत आहे याचा पुरावा मिळाला आहे. कोरोनाची लागण झालेली आहे मात्र याची माहितीच Pre Symptomatic रुग्णांना नसते. त्यांच्यापासून इतरांना तो होतो आणि तेसुद्धा संसर्ग होणाऱ्या व्यक्तीला कळत नाही.

हेही वाचा: मुंबईकरांसाठी चांगली बातमी: सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

जिमिनेज यांनी सांगितलं की, अशा प्रकारचे लोक ना खोकतात, ना शिंकतात. ते त्यांचं आयुष्य नेहमीप्रमाणे जगतात, कुटुंबात वावरतात आणि बाहेरही फिरतात. यातून ते कोरोना पसरवत आहेत. याला रोखायचं असेल तर तुम्ही असं मानलं पाहिजे की तुमच्यासमोर कोरोनाबाधित व्यक्तीच आहे.

आपण सध्या कोरोनाच्या विळख्यात का आहे? याची तीन कारणं जिमिनेज यांनी सांगितली आहेत. यामध्ये याला रोखण्यासाठी कोणामध्ये प्रतिकारशक्ती नाही. दुसरं म्हणजे हा हवेतून तयार होतो आणि सहज पसरतो. तिसरं कारण म्हणजे लक्षणं नसलेल्या लोकांपासून संसर्ग होत आहे. यांनाच Pre Symptomatic म्हटलं जातं.

हेही वाचा: कोरोना रोखण्यासाठी प्रशासन सतर्क; मात्र आरोग्य विभाग गायब

सार्स कोव 1 आणि सार्स कोव 2 या साथरोगांमध्ये काही बाबी समान आहेत. 2003 मध्ये सार्स कोव 1 हवेतून पसरत होता आणि याला रोखणारी प्रतिकार शक्ती नव्हती. सार्स कोव 1 चा संसर्ग Pre Symptomatic असा नव्हता. जे खूप आजारी असायचे त्यांच्याकडून पसरायचा. त्यामुळे सार्स कोव 1 ओळखणं सोपं होतं. सार्स कोव 1 चे फक्त 9 हजार रुग्ण सापडले होते. मात्र कोरोनाचे दिवसाला लाखो रुग्ण सापडत आहेत. त्यामुळेच जिमिनेज यांनी Pre Symptomatic रुग्ण धोकादायक ठरु शकतात असं सांगितलं आहे.

कोरोनाचा संसर्ग हा हवेच्या माध्यमातून होत असतो. जिमिनेज यांनी केलेल्या दाव्याची पुष्टी केली जाऊ शकत नाही किंवा याला पूर्णपणे फेटाळूही शकत नाही. कोरोनाने सुरुवातीपेक्षा आता वेगळे रुप धारण केले आहे. शिवाय त्याचे संक्रमण आता पूर्वीपेक्षा जास्त होताना दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकालाच वैयक्तिक पातळीवर काळजी घेण्याची आवश्यकता आहे.