अमेरिकेला भीती आहे जवानांकडूनच हल्ला होण्याची

पीटीआय
Tuesday, 19 January 2021

अनेक बाबतीत अभूतपूर्व झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूकीचे नाट्य संपण्याची अद्यापही चिन्हे नाहीत. कॅपिटॉलमधील हिंसाचारानंतर शपथविधीवरही हल्ल्याचे सावट असताना, हा हल्ला अंतर्गत यंत्रणेतील अथवा सुरक्षा रक्षकांपैकीच कोणाकडून तरी होण्याची शक्यता असल्याचे येथील सैन्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

वॉशिंग्टन - अनेक बाबतीत अभूतपूर्व झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूकीचे नाट्य संपण्याची अद्यापही चिन्हे नाहीत. कॅपिटॉलमधील हिंसाचारानंतर शपथविधीवरही हल्ल्याचे सावट असताना, हा हल्ला अंतर्गत यंत्रणेतील अथवा सुरक्षा रक्षकांपैकीच कोणाकडून तरी होण्याची शक्यता असल्याचे येथील सैन्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेसाठी वॉशिंग्टनमध्ये येणाऱ्या २५ हजार सैनिकांवरही ‘एफबीआय’कडून नजर ठेवली जाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुप्तचरांनी हिंसाचाराची शक्यता वर्तविल्यानंतर वॉशिंग्टनमध्ये अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था राखण्यात येत असून शहराला किल्ल्याचे स्वरुप आले आहे. मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांना रोखण्यासाठी अतिरिक्त कुमक वॉशिंग्टनमध्ये तैनात करण्यात येत आहे. वीस जानेवारीला अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून ज्यो बायडेन हे शपथ घेणार असून कमला हॅरिस यादेखील उपाध्यक्ष पद स्वीकारणार आहेत. हा सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, आगामी काही दिवसांसाठी येणाऱ्या सुरक्षा रक्षकांकडूनच बायडेन यांना धोका असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. सुरक्षेच्याबाबतीत प्रशासन सावध झाले असून, कॅपिटॉलशेजारील इमारतीत आज आग लागल्यानंतर काही काळासाठी कॉपिटॉल पूर्णपणे बंद करण्यात आले होते.

19 व्या वर्षी बनली होती सर्वात श्रीमंत महिला; बाथरूममधील फोटोमुळे झाली ट्रोल

हॅरिस यांचा राजीनामा
नियोजित उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी आज आपल्या सिनेट सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सदस्यत्व सोडल्याने डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते अलेक्स पॅडिला हे त्यांची जागा घेणार आहेत. हॅरिस यांचा उर्वरित दोन वर्षांचा कार्यकाळ तेच पूर्ण करणार आहेत. 

सोनिया देणार कमला यांना शपथ
अमेरिकेच्या पहिल्या कृष्णवर्णीय, पहिल्या दक्षिण आशियाई आणि पहिल्या महिला उपाध्यक्षा म्हणून कमला हॅरिस या वीस जानेवारीला शपथ घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. सोनिया सोतोमायोर या त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. न्या. सोनिया या अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या हिस्पॅनिक (स्पॅनिश संस्कृतीच्या) न्यायाधीश आहेत.

पुतीन यांचे कट्टर विरोधक नवाल्नींना अटक; नाट्यमय पद्धतीने घेतलं ताब्यात

शपथविधीसाठी बायबलच्या दोन प्रती
कमला हॅरिस या बायबलच्या दोन प्रतींच्या साक्षीने शपथग्रहण करणार आहेत. यातील एक प्रत, कमला यांना आईसारख्याच असणाऱ्या रेजिना शेल्टन यांच्या वापरातील आहे. दुसरी प्रत थर्गुड मार्शल यांची आहे. मार्शल हे नागरी हक्क चळवळीतील बडे नेते होते. सर्वोच्च न्यायालयात काम करणारे ते पहिले आफ्रिकी वंशाचे अमेरिकी नागरिक होते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US fears an attack by its own troops