अन् मोदींच्या पत्नीसाठी गार्डने उघडला कारचा दरवाजा

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जून 2017

अमेरिकेचा प्रोटोकॉलही असू शकतो
पंतप्रधान मोदी व्हाईट हाऊसमध्ये पोहचल्यानंतर ज्याप्रमाणे दोन्ही दरवाजे उघडण्यात आले. तसेच मोदी आपली चर्चा संपवून परत जात असतानाही त्यांच्या कारचे दोन्ही दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे हा अमेरिकेच्या प्रोटोकॉलचाही भाग असल्याची शक्यता आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाऊस येथे गेले असताना त्यांच्यासोबत पत्नीही असल्याच्या कारणाने सुरक्षारक्षकाने चक्क त्यांचा कारचा दरवाजा उघडला. मात्र, मोदी दुसऱ्या दरवाजाने बाहेर येत ट्रम्प यांना भेटले. सोशल मिडीयावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हाईट हाऊस येथे मोदी आणि ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प याही उपस्थित होत्या. दहशतवाद, व्यापार यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. ट्रम्प यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच यांच्यात चर्चा होत आहे. गळाभेट घेतल्यानंतर संयुक्तरित्या निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये त्यांनी जगातून दहशतवाद संपुष्टात आणण्याचे वक्तव्य केले. पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांचे आभार मानत, हा माझा नाही तर भारतातील सव्वाशे कोटी नागरिकांचा सन्मान असल्याचे म्हटले आहे.

मोदी व्हाईट हाऊस येथे पोहचले असताना डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प त्यांच्या स्वागतासाठी कारच्या उजव्या बाजूला उभ्या होत्या. मोदींची कार तेथे येताच सुरक्षारक्षकांनी कारजवळ जात दोन्ही बाजूचे दरवाजे उघडले. उजव्या बाजूच्या दरवाजातून मोदी बाहेर उतरले. मात्र, डाव्या बाजूचा दरवाजा उघडूनही कोणीच बाहेर आले नाही. सुरक्षारक्षकाने हा दरवाजा का उघडला, कोणासाठी उघडला याबाबत सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरु झाली. 

अमेरिकेचा प्रोटोकॉलही असू शकतो
पंतप्रधान मोदी व्हाईट हाऊसमध्ये पोहचल्यानंतर ज्याप्रमाणे दोन्ही दरवाजे उघडण्यात आले. तसेच मोदी आपली चर्चा संपवून परत जात असतानाही त्यांच्या कारचे दोन्ही दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे हा अमेरिकेच्या प्रोटोकॉलचाही भाग असल्याची शक्यता आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
पुणे: चार धरणांत मिळून 0.12 टीएमसीने वाढ​
माण: बोअरवेलमध्ये पडलेल्या मंगेशचा अखेर मृत्यू
सलाहुद्दीनला ठरविले जागतिक दहशतवादी​
सर्जिकल स्ट्राइकवर एकही प्रश्‍न नाही: नरेंद्र मोदी​
मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेपासून रोखणार​
शाहू कार्यात तंत्रज्ञानाधारित रोजगाराची बीजं - डॉ. रघुनाथ माशेलकर​
३१ दिवस, पावणे चारशे तास आणि ४६ हजार पोळ्या​ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US guard opening the left door of the car expecting Mrs Modi?