मोठी बातमी : एचवन-बी व्हिसाच्या नियमांमध्ये बदल

वृत्तसंस्था
Thursday, 13 August 2020

अमेरिकेतील आगामी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळाव्या म्हणून, अध्यक्ष ट्रम्प यांनी एचवन-बी व्हिसावर वर्षाअखेरपर्यंत बंदी घातली आहे.. 

वॉशिंग्टन : अमेरिकेने एचवन-बी व्हिसा संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळं अमेरिकेत काम करू इच्छिणाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अमेरिकेतील आगामी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळाव्या म्हणून, अध्यक्ष ट्रम्प यांनी एचवन-बी व्हिसावर वर्षाअखेरपर्यंत बंदी घातली आहे. आता नवा नियम लागू करून ट्रम्प सरकारने थोडा दिलासा दिलाय. 

हे वाचा : रशियाचा हट्टीपणा; संशयास्पद कोरोना लशीचं उत्पादन सुरू करणार

काय आहे पार्श्वभूमी?
भारतातून आयटी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर तरुण अमेरिकेत नोकरीच्या निमित्ताने जातात. अशांसाठी अमेरिकेकडून एचवन-बी व्हिसा सुविधा पुरवण्यात येते. ही सुविधा संबंधित व्यक्तीसह त्याच्या कुटुंबियांनाही लागू असते. या व्हिसावर बाहेरील देशातून मोठ्या प्रमाणवर तरुण अमेरिकेत दाखल झाल्यामुळं स्थानिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळत असल्याचा आरोप झाल्यानंतर ट्रम्प यांनी स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा उचलून धरला आणि नव्यानं एचवन-बी व्हिसा देण्यावर बंद घातली आहे. आता हे निर्बंध घालताना ट्रम्प सरकारने काही नियमांमध्ये बदल केले आहेत. अर्थातच, हे नियम स्वागतार्ह आहेत. 

हे वाचा - सलग आठव्या दिवशी देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा अमेरिका, ब्राझीलपेक्षाही अधिक

तर, अमेरिकेत काम करता येणार!
एचवन बी व्हिसावर बंदी घालताना, ट्रम्प प्रशासनाने पुन्हा अमेरिकेत नोकरीसाठी येणाऱ्यांना संधी असल्याचे स्पष्ट केले आहे. पण, त्यातही व्हिसावर बंदी घालण्यापूर्वी  संबंधित व्यक्ती अमेरिकेत जे काम करत होती. त्यासाठीच त्यांना अमेरिकेत परतता येणार आहे. विशेष म्हणजे, संबंधित व्यक्तीवर जर, त्याची पत्नी, मुलं आणि इतर कुटुंबिय अवलंबून असतील, तर त्यांनाही अमेरिकेत जाता येणार आहे. यात संबंधित व्यक्तीची कंपनीही तिच असावी आणि त्या कंपनीतील त्या व्यक्तीचे पदही तेच असायला हवे, असे ट्रम्प प्रशासनाच्या अडवायजरीमध्ये म्हटले आहे. 

हे वाचा - रशियाची कोरोनावरील लस लाखो लोकांना देणं घातक; वाचा जगभरातील देशांच्या प्रतिक्रिया

चिंता अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची 
ज्या व्यक्ती तंत्रज्ञानातील एक्सपर्ट आहेत. वरिष्ठ पातळीवरच्या महत्त्वाच्या पदांवर काम करत आहेत आणि त्या एचवन-बी व्हिसावर अमेरिकेत काम करत असतील. तर, त्यांच्यासाठी तातडीच्या व्हिसाचीही व्यवस्था केली जाईल किंवा त्यांचा व्हिसा पुढे तसाच सुरू ठेवला जाईल. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला जर उभारी मिळत असेल तर, यात कोणतिही तडजोड केली जाणार नाही, अशा स्वरूपाची माहिती ट्रम्प प्रशासनाकडून देण्यात आलीय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us h1b visa new rules for previous employees before ban