

America new visa bond policy
ESakal
अमेरिकेने आता आपला व्हिसा बाँड कार्यक्रम कायमस्वरूपी केला आहे. नवीन नियमानुसार, काही विशिष्ट देशांच्या नागरिकांना व्यवसाय (बी-१) आणि पर्यटक (बी-२) व्हिसा मिळण्यापूर्वी २०,००० डॉलर्स (अंदाजे १७ लाख रुपये) पर्यंतचा बाँड किंवा सुरक्षा रक्कम जमा करावी लागू शकते. हा नवीन नियम ३ ऑगस्टपासून लागू होईल. अमेरिकन सरकारने फेडरल रजिस्टरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे हा निर्णय घेतला आहे.