आशियासह जगभरात लोक होतायत बेपत्ता; अमेरिकेच्या संसदेत मानवाधिकारासाठी एल्गार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

अमेरिकेतील दोन ताकदवर संसद सदस्यांनी आपल्या संसदेत एक प्रस्ताव दाखल केला आहे.

वॉशिंग्टन: अमेरिकेतील दोन ताकदवर संसद सदस्यांनी आपल्या संसदेत एक प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावामध्ये त्यांनी आशियासहित संपूर्ण जगभरात लोकांना गायब करणाऱ्या घटनांना बंद करण्याची मागणी केली आहे. या प्रस्तावामध्ये श्रीलंकामधील तमिल भाषिक लोक आणि चीनमधील उईगर मुस्लिमांसहीत सर्व पीडितासांठी न्यायाची मागणी केली गेलीय. 

हेही वाचा - पाकिस्तानात सापडलं 1300 वर्षे जुनं मंदिर; हिंदू शाही काळाच्या खाणाखुणा अजूनही ताज्या

काँग्रेस सदस्य ब्रॅड शेरमॅन आणि जॅमी रस्किन यांनी हा प्रस्ताव आणला आहे. यामध्ये अमेरिकेद्वारे 'इंटरनॅशनल कन्व्हेंन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ ऑल पर्सन्स फ्रॉम एन्फोर्स्ड डिसअपिरियंसेस'चे अनुमोदन करण्याची मागणी केली आहे. 
शेरमॅन यांनी म्हटलंय की, मानवाधिकारांच्या या प्रकारच्या उल्लंघनाबाबत काहीतरी करण्याची आवश्यकता आहे. लोकांना गायब करणं आणि मानवाधिकारांच्या अन्य उल्लंघनाच्या बाबतीत आपल्याला आवाज उठवला पाहिजे. तसेच या प्रकारांना आळा घालण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत काम करण्याची आवश्यकता आहे. रस्किन यांनी म्हटलं की, लोकांना गायब करण्याची समस्या आशिया आणि जगातील इतर भागातील मानवाधिकारांचे उल्लंघन करणारी आहे. 

हेही वाचा - अभिमानास्पद! भारतीय वंशाच्या माला अडिगांची 'बायडेन टीम'मध्ये महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

पाकिस्तानातील सिंध समुदाय, श्रीलंकेतील तमिळ आणि मानवाधिकार कार्यकर्ते, इंडोनेशियामधील सुहार्तो शासनाचे पीडित आणि चीनमधील उईगर मुस्लिमांच्या विरोधात या प्रकारच्या नृशंस अपराधाला रोखण्यासाठी आणि सर्व पीडितांना न्याय देण्याचे समर्थन  या  प्रस्तावात केलं आहे. या प्रस्तावाचे एमनेस्टी इंटरनॅशनलने समर्थन केलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us house proposal against the disappearance of people in asia and the world