अमेरिकेेने इराकवर निर्बंध वाढवले; क्षेपणास्त्र हल्ला इराणला भोवणार?

वृत्तसंस्था
Sunday, 12 January 2020

इराणचे लष्करी कमांडर कासीम सुलेमानी यांचा मृत्यूपूर्वी अमेरिकेच्या चार दूतावासांवर हल्ला करण्याचा कट होता.

वॉशिंग्टन : इराणचे लष्करी कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांना ठार मारल्यानंतर अमेरिका आणि इराणमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. इराणने अमेरिकेच्या तळांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला उत्तर म्हणून अमेरिकेने नवे निर्बंध शनिवारी (ता.11) घातले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पश्‍चिम आशियात अस्थिरता निर्माण करणाऱ्या आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला करण्यात सहभागी अधिकाऱ्यांचे या निर्बंधांमुळे मोठे नुकसान होईल, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ आणि अर्थमंत्री स्टिव्हन म्युचिन यांनी दिला आहे.

- रहाणेच्या ट्विटवर तेंडुलकरचं उत्तर, प्रश्न वाचाल तर तुम्हीही म्हणाल..

इराणच्या वस्त्र, खनिकर्म, बांधकाम आदी क्षेत्रांशी संबंधित लोकांवर निर्बंध घालण्याचा आदेश जारी करतील. तसेच पोलाद आणि लोह क्षेत्रावरही वेगवेगळे निर्बंध घातले जातील. याद्वारे इराणच्या सरकारला देण्यात येणारी कोट्यवधी डॉलरची मदत रोखली जाणार आहे, असे म्युचिन म्हणाले. 

- ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; काय केले आवाहन?

अमेरिकी दूतावासांवर हल्ल्याचा कट 

इराणचे लष्करी कमांडर कासीम सुलेमानी यांचा मृत्यूपूर्वी अमेरिकेच्या चार दूतावासांवर हल्ला करण्याचा कट होता, असे मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (ता. 10) एका वाहिनीला मुलाखत देताना व्यक्त केले आहे. या मुख्यत्वे बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासाचा समावेश होता, असे ते म्हणाले.

- डोळ्यांत अश्रू येतील; वडिलांचं हेल्मेट घालून चिमुकली पोहोचली अंत्ययात्रेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US imposes new sanctions on Iran after Irans missile attack on US bases