US-Iran Tensions Escalate
esakal
मध्य पूर्वेत वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आता मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. डोनाल्ड ट्रम्प इराणवर दबाव आणण्यासाठी खर्ग बेटावर ताबा मिळवण्याची शक्यता आहे. यासाठी अमेरिका २५०० सैनिकांची तुकडी इराणमध्ये पाठवण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती समोर आली आहे.
खर्ग हे बेट इराणसाठी अत्यंत महत्त्वाचे असून येथूनच इराणचे जवळपास ९० टक्के कच्चे तेल निर्यात होते. या बेटावर नियंत्रण मिळवल्यास इराणला होर्मूज सामुद्रधुनी खुली करण्यास भाग पाडता येईल, अशी अमेरिकेची योजना आहे.