अमेरिकेत नोकरीसाठी जायचंय? नशिबाची साथ लागणार!

टीम ई-सकाळ
Sunday, 7 February 2021

अमेरिकेत नोकरी करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या एच-१ बी व्हिसा आवश्यक असतो. अमेरिकेतल्या अनेक कंपन्यांना कमी पैशांत मनुष्यबळ उपलब्ध होत असल्यामुळं कंपन्या भारत, चीन, फिलिपिन्स यांसारख्या देशांमधून कर्मचारी रुजू करून घेतात.

वॉशिंग्टन : अमेरिकेत नोकरी व्यवसायानिमित्त जाण्याचं स्वप्न अनेकजण उराशी बाळगून असतात. काहींना तर अमेरिकेत स्थायिक व्हायचं असतं. पण, सगळ्यांचच हे स्वप्न पूर्ण होत नाही. त्यातच गेल्या काही वर्षांत विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत अमेरिकन ड्रीम अर्थात अमेरिकेत जाण्याच्या स्वप्नाला खीळ बसली होती. मात्र, ट्रम्प यांच्या पराभवानंतर जो बायडन सत्तेवर आले आहेत आणि चित्र बदलण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

आणखी वाचा - मियाँ खलिफाचं आणखी एक ट्विट, सरकारला म्हणाली फॅसिस्ट

भारतीयांची संख्या अधिक
अमेरिकेत नोकरी करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या एच-१ बी व्हिसा आवश्यक असतो. अमेरिकेतल्या अनेक कंपन्यांना कमी पैशांत मनुष्यबळ उपलब्ध होत असल्यामुळं कंपन्या भारत, चीन, फिलिपिन्स यांसारख्या देशांमधून कर्मचारी रुजू करून घेतात. बहुतांश वेळा या कंपन्याच कर्मचाऱ्यांच्या व्हिसाची जबाबदारी घेतात आणि त्यांना व्हिसा मिळवूनही देतात. सध्या एच-वन बी व्हिसाची प्रक्रिया थांबलेली आहे. त्यामुळं अनेकांना नोकरीसाठी अर्ज करणे अशक्य होत आहे. पण, ही प्रक्रिया आता पुन्हा सुरू होत आहे.

ऑक्टोबर उजाडणार
आता एच-१ बी व्हिसासाठी नोंदणी प्रक्रिया ९ मार्चपासून सुरु होणार आहे. अर्जांची छाननी झाल्यावर ३१ मार्चला लॉटरी पद्धतीने अर्ज मंजूर झालेल्यांची नावे जाहीर केली जातील, असे अमेरिकेच्या स्थलांतर विभागाने जाहीर केले आहे. अमेरिकेचे नवे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी व्हिसा मंजुरी लॉटरी पद्धतीनेच होणार असल्याचे जाहीर केले होते. अर्ज मंजूर झालेल्यांना एक ऑक्टोबरनंतर अमेरिकेत नोकरी करता येणार आहे.

आणखी वाचा - थरारक व्हिडिओ; जीव मुठीत धरलेल्या 16 जवानांची सुटका

संख्या घटली पण, अमेरिकेलाच पसंती
कोरोना व्हायरस नंतर, जगाची परिस्थिती बदलली आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळले तसेच तेथे मनुष्यहानीही मोठ्या प्रमाणावर झाली. पण, आजही नोकरी, व्यवसायासाठी भारतीय तरुण अमेरिकेलाच पहिली पसंती देत आहेत. गेल्या वर्षीच्या डेटानुसार, जानेवारी 2019मध्ये 58 टक्के तरुण अमेरिकेत नोकरी शोधणारे होते. जून 2020मध्ये ही टक्केवारी 42वर आली. पण, तरिही तरुण अमेरिकेलाच सर्वांत पहिली पसंती देत आहेत.

अमेरिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us jobs h1b visa process will start march 2021