चर्चेला नाही म्हणणाऱ्या बायडेन-जिनपिंग यांची तब्बल साडेतीन तास बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चर्चेला नाही म्हणणाऱ्या बायडेन-जिनपिंग यांची साडेतीन तास बैठक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची बैठक पार पडली. जवळपास साडेतीन तास ही बैठक व्हर्च्युअल स्वरुपात झाली.

चर्चेला नाही म्हणणाऱ्या बायडेन-जिनपिंग यांची साडेतीन तास बैठक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

गेल्या काही काळामध्ये बिघडत असलेल्या संबंधांबाबत अमेरिका आणि चीन यांनी चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. तैवानपासून ते कोरोनापर्यंत अनेक मुद्द्यांवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची बैठक पार पडली. जवळपास साडेतीन तास ही बैठक व्हर्च्युअल स्वरुपात झाली. यामध्ये दोन्ही नेत्यांनी अमेरिका चीन यांच्यातील स्पर्धा ही संघर्षात रुपांतरीत होऊ नये यावर भर दिला.

ज्यो बायडेन आणि शी जिनपिंग हे दोघेही भेटीसाठी तयार नव्हते. मात्र अखेर दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली आणि ही बैठक तब्बल ३ तास २४ मिनिटे चालली. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटलं की, दोन्ही देशांमध्ये असलेल्या स्पर्धेत कोणत्याही प्रकारे संघर्ष होऊ नये आणि हे निश्चित करण्याचं ध्येय आहे.

हेही वाचा: चीन बनला जगातला सर्वात 'श्रीमंत देश'

अमेरिका आणि चीन यांच्यात सध्या असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. बायडेन यांनी चीनमध्ये उइगर मुस्लिमांवर होत असलेला अन्याय, मानवाधिकाराच्या अधिकाराचे उल्लंघन, हाँगकाँगमध्ये लोकशाही मार्गाने होणाऱे आंदोलन चिरडणे, तैवानविरोधात लष्करी कारवाई इत्यादी मुद्द्यांवर चीनला आतापर्यंत अनेकदा सुनावलं आहे. तर शी जिनपिंग यांनी बायडेन यांच्या प्रशासनावर निशाणा साधताना चीनच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये हस्तक्षेपाचा आरोप केला आहे.

बैठकीच्या सुरुवातीला बायडेन यांनी म्हटलं की, चीन आणि अमेरिकेचे नेते असल्याच्या नात्यानं आपली जबाबदारी आहे की, दोन्ही देशांमधील स्पर्धा ही निकोप व्हावी, मैत्रीपूर्ण असावी. यामुळे तणाव, संघर्ष निर्माण होऊ नये. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी बायडेन यांना म्हटलं की, दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची गरज आहे. बायडेन हे माझे जुने मित्र आहेत. तुमच्यासोबत काम करण्यासाठी, आपल्यात एकमत होण्यासाठी आणि योग्य पावले उचलण्यासाठी तयार आहे असंही जिनपिंग म्हणाले.

loading image
go to top