esakal | अमेरिकेच्या खासदारांनी पत्र पाठवले भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना; वाचा काय आहे पात्रात
sakal

बोलून बातमी शोधा

eliot and michael

चीनच्या आक्रमक कारवायांच्या पार्श्वभूमीवर भारत-अमेरिका यांच्यातील सौहार्दपूर्ण द्विपक्षीय संबंधांना महत्त्व प्राप्त झाले आहे, असे अमेरिकेच्या दोन खासदारांनी म्हटले आहे. त्यांनी तसे संयुक्त पत्र भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पाठविले आहे.

अमेरिकेच्या खासदारांनी पत्र पाठवले भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना; वाचा काय आहे पात्रात

sakal_logo
By
यूएनआय

India वॉशिंग्टन - चीनच्या आक्रमक कारवायांच्या पार्श्वभूमीवर भारत-अमेरिका यांच्यातील सौहार्दपूर्ण द्विपक्षीय संबंधांना महत्त्व प्राप्त झाले आहे, असे अमेरिकेच्या दोन खासदारांनी म्हटले आहे. त्यांनी तसे संयुक्त पत्र भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पाठविले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिकी सभागृहाच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष एलियट एजल आणि समितीचे मानांकन सदस्य मायकेल टी. मॅकॉल यांनी हे पत्र पाठविले आहे. पाच ऑगस्ट रोजी 370वे कलम रद्द करण्यात आल्याच्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून हे पत्र पाठविण्यात आले.

चीनची क्षेपणास्त्र चाचणी; संपूर्ण भारत आणि अमेरिकेचं नौदल तळही होऊ शकतं टार्गेट

त्यात म्हटले आहे की, वर्षभरानंतरही जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुरळीत नाही हे नमूद करताना आम्हाला चिंता वाटते. फेब्रुवारीत नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की आता उभय देशांतील संबंध ही काही दुसरी कुठली तरी भागीदारी नसून त्यास अत्यंत व्यापक स्वरूप आहे. चीनलगतच्या सीमेवर तुम्हाला आक्रमक कारवायांना सामोरे जावे लागत आहे. आशिया-पॅसिफीक विभागात चीनने सतत बेकायदेशीर कारवायांचे धोरण ठेवले आहे.

Edited By - Prashant Patil