

American Navy Medical Aircraft Crash Leaves 5 Dead 3 Missing
Esakal
अमेरिकेत टेक्सासमध्ये नौदलाच्या लहान विमानाचा अपघात झाला असून यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. एअर अॅम्ब्युलन्सने एका रुग्णाला नेत असताना ही दुर्घटना घडलीय. विमानातून ८ जण प्रवास करत होते. अमेरिकन कोस्ट गार्डने दिलेल्या माहितीनुसार, टेक्सासमध्ये गॅल्वस्टन किनारपट्टीजवळ मेक्सिकोच्या नौदलाचं एक लहान विमान दुर्घटनाग्रस्त झालं. यात पाच जणांचा मृत्यू झालाय. तर इतरांचा शोध घेतला जात आहे.