दिल्लीतील हल्ल्याबद्दल ट्रम्प यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले...

वृत्तसंस्था
Sunday, 5 January 2020

जर अमेरिकेच्या नागरिकांना कोठेही धमकावल्यास, तर आमची 'टार्गेट' यादी तयार आहे. गरजेनुसार सर्व प्रकारची कारवाई करण्यास अमेरिका तयार आहे.

वॉशिंग्टन : अमेकिने केलेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च लष्करी कमांडर जनरल कासीम सुलेमानी ठार झाले. या घटनेचे समर्थन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्लीपासून लंडनपर्यंतच्या दहशतवादी कारवायांमध्ये कासीम सुलेमानी यांचा सहभाग होता, असा दावाही ट्रम्प यांनी शनिवारी (ता.4) केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फ्लोरिडातील मारे लागो येथे पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी इराणच्या सर्वोच्च 'अल-कुदस' सैन्याचे प्रमुख असलेले सुलेमानी ठार झाल्याने 'दहशतवादी राज्य' संपुष्टात आले, असे सांगितले. सुलेमानी यांचा दिल्लीवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट होता, असे त्यांनी म्हटले, तरी त्याबाबत अधिक माहिती दिली नाही.

- नव्या वर्षात पाकिस्तानला दणका; महागाईने गाठला कळस

दिल्लीत फेब्रुवारी 2012मध्ये इस्राईली राजनैतिक अधिकाऱ्याची पत्नी ताल येहोशुआ कोरेन या मुलांना शाळेत सोडून परत येताना त्यांच्या मोटारीत झालेल्या बॉंबस्फोटात त्यांच्यासह चालक व अन्य दोघे जखमी झाले होते. पोलिस तपासात हल्ल्यामागे इराणच्या 'रेव्होल्युशनरी गार्डस' हा हात असल्याचे उघडकीस आले होते. या घटनेचा संबंध ट्रम्प यांनी जनरल कासीम यांच्याशी जोडल्याचे मानले जात आहे. 

- पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील सत्यता समोर; लाखो कनेक्शन...

''जर अमेरिकेच्या नागरिकांना कोठेही धमकावल्यास, तर आमची 'टार्गेट' यादी तयार आहे. गरजेनुसार सर्व प्रकारची कारवाई करण्यास अमेरिका तयार आहे, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. अमेरिकेने केलेली कारवाई कायदेशीर असल्याचे सांगत ट्रम्प म्हणाले, की आम्ही जे काल केले ते खूप आधीच करायला हवे होते. अनेकांचे जीव वाचले असते. इराणमधील निदर्शने क्रूर पद्धतीने दाबून टाकण्याचा प्रयत्न सुलेमानी यांनी केला होता. इराण सरकारने त्यांच्याच एक हजार निष्पाप लोकांचा अनन्वित छळ करून मारले आहे. 

- ...म्हणून मेंढीला घातली 'ब्रा'

इराणी नागरिकांचा आदर 

''हा हल्ला आम्ही युद्ध रोखण्यासाठी केला आहे. इराणी नागरिकांप्रती माझ्या मनात नितांत आदर आहे. त्यांना उच्च संस्कृती आणि परंपरा आहे. इराणमध्ये सत्ताबदल करण्याची आमची इच्छा नाही. परंतु, जनरल कासीम अमेरिकेचे राजनैतिक अधिकारी आणि सैनिकांना लक्ष्य करण्याचे कारस्थान रचत होता म्हणून आम्ही त्याला ठार केले,'' असा खुलसा ट्रम्प यांनी या वेळी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US president Donald Trump claimed that Kasim Sulaimani was involved in terrorist activities from Delhi to London