esakal | ...म्हणून मेंढीला घातली 'ब्रा'
sakal

बोलून बातमी शोधा

sheep in bra

एका मेंढीला 'ब्रा' घालण्यात आली असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेंढीला कशामुळे ब्रा घातला यामागील कारण समजल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले आहेत.

...म्हणून मेंढीला घातली 'ब्रा'

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडनः एका मेंढीला 'ब्रा' घालण्यात आली असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेंढीला कशामुळे ब्रा घातला यामागील कारण समजल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले आहेत.

Video: कुत्र्याने बदलला गिअर अन्...

मेंढीचे छायाचित्र व्हायरल होऊ लागल्यानंतर काहींनी फॅशन शोमधील छायाचित्र असल्याच्या प्रतिक्रिया नोंदविल्या. पण, खरे कारण वेगळेच आहे. संबंधित मेंढी ही ब्रिटनमधील आहे. फ्रॅंकलिन वेट्स लाइफस्टाइल फार्म्सने मेंढीची छायाचित्रे फेसबुकवर पोस्ट केली आहेत. पोस्ट अपलोड करताना या फोटोला, 'ब्रामध्ये मेंढी ! फोटो काढण्यासाठी असे केले नाही आहे', असे कॅप्शन दिले आहे.

मेंढीचे नाव आहे 'रोझ'. रोझ नावाची मेंढी गर्भवती आहे. गर्भाशयातील वजन जास्त झाल्याने तिचे अस्थिबंधन खराब झाले. शरीरावरुन त्याचे जड अवयव टांगलेले होते. अंग इतके लटकत होते की ते खाली जमिनीवर स्पर्श करत होते. शिवाय, मेंढलाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. मेंढीची काळजी घेणे गरजेचे होते. मेंढीला ब्रा घातला नसता तर दुखापत झाली असती, शिवाय, मेंढरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकले असते. म्हणून, मेंढीला ब्रा घालण्यात आली आहे.

Video: घोड्याला दररोज सकाळी लागतो एक कप चहा...

फेसबुकवरील पोस्ट वाचल्यानंतर मेंढी व मालकाविषयी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. प्रतिक्रियांमध्ये नेटिझन्सनी म्हटले आहे की, 'मेंढी खूप भाग्यवान आहे आणि मालक महान आहे. मी तुम्हाला सांगू शकतो की, आपल्या पाळीव प्राण्यांना तुम्ही आवडता. आम्हाला तुमच्यासारख्या अधिक शेतकऱ्यांची गरज आहे. अफवा पसरवू नयेत.'

गुन्हेगाराच्या कुत्र्यावर करतात पोलिस प्रेम!