निवडणुकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे पहिलेच भाषण; म्हणाले, लवकरच...

donald trump main.jpg
donald trump main.jpg

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी भाषण केले. पुढीलवर्षी एप्रिलपर्यंत अमेरिकन नागरिकांना कोरोना लस मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निकालानंतरचे ट्रम्प यांचे पहिलेच जाहीर भाषण होते.  

औषध निर्मिती कंपनी फायजरच्या कोरोना लशीची ताजी माहिती देताना ट्रम्प म्हणाले की, 2021 च्या एप्रिल महिन्यापर्यंत कोविड-19 लस अमेरिकतल्या सर्व नागरिकांना मिळेल. येत्या काही आठवड्यात सुरुवातीला कोविड योद्धे, ज्येष्ठ नागरिक आणि हाय रिस्कमध्ये असलेल्या अमेरिकन नागरिकांना लस दिली जाईल. देशातील प्रत्येक नागरिकाला फायजर लस मोफत मिळेल. ट्रम्प हे व्हाइट हाऊस येथील रोझ गार्डन येथे बोलत होते. 

यापूर्वी शुक्रवारी आलेल्या वृत्तानुसार आलेल्या अमेरिकेत जो बायडन यांनी एरिझोना आणि जॉर्जिया प्रांतातही विजय मिळवला आहे. शुक्रवारी विजयाची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर डेमोक्रॅटिक पक्षाने 306 इलेक्टॉरल मते मिळवली आहे. तर रिपब्लिकनचे डोनाल्ड ट्रम्प यांना 232 मते मिळवली आहेत. ट्रम्प यांनी नॉर्थ कॅरोलिनामध्ये विजय नोंदवला आहे. 

निवडणुकीच्या निकालानंतरचे ट्रम्प यांचे हे पहिले सार्वजनिक भाषण होते.यापूर्वी त्यांनी आपले अखेरचे भाषण हे 5 नोव्हेंबर रोजी केले होते. त्यावेळी त्यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. दरम्यान, फायझर कंपनीने तयार केलेली लस 90 टक्के परिणामकारक ठरू शकते, असे कंपनीने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com