esakal | भारतीय आयटीयन्सना धक्का: एचवन-बी व्हिसाच्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प यांचे शिक्कामोर्तब
sakal

बोलून बातमी शोधा

us president donald trump signs order about h1 b visa impact IT professionals

अमेरिकेत चीन आणि भारतातून आलेल्या तरुणांना मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी आहेत. विशेषतः आयटी क्षेत्रात भारतीय तरुणांना मोठी मागणी आहे.

भारतीय आयटीयन्सना धक्का: एचवन-बी व्हिसाच्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प यांचे शिक्कामोर्तब

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

वॉशिंग्टन :एचवन-बी व्हिसा संदर्भातील निर्णयावर आज, अमेरिकेचे (USA) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शिक्कामोर्तब केले. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळं भारतातील लाखो तरुणांच्या स्वप्नांना धक्का बसला आहे. अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. 

जगभरातील इतर घडामोडींसाठी येथे क्लिक करा

अमेरिकेत कोरोना आणि लॉकडाउनच्या आधीपासूनच वाढत्या बेकारीचा मुद्दा चर्चेत होता. त्यात कोरोनानं भर घातली. त्याची दखल घेत, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन कंपन्यांनी स्थानिक तरुणांनाच नोकरीत प्राधान्य द्यावे, यासाठी एचवन-बी हा वर्किंग व्हिसा डिसेंबर 2020पर्यंत न देण्याचे जाहीर केले. या संदर्भात अमेरिकेत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. पण, हा निवडणुकीचा मुद्दा असल्यानं ट्रम्प यांनी तो उचलून धरलाय. आज ट्रम्प यांनी यासंदर्भातील लेखी आदेशांवर सह्या केल्या. 

आणखी वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांचा टिकटॉकला अल्टिमेटम; वाचा सविस्तर बातमी

काय म्हणाले ट्रम्प?
एचवन-बी व्हिसा संदर्भात घेतलेल्या निर्णयावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'कोणत्याही अमेरिक व्यक्तीचा रोजगार जाऊ नये, या उद्देशाने एचवन-बी संदर्भात आम्ही घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत आहोत. एचवन-बी व्हिसाचा वापर हा, अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या घालवण्यासाठी नाही तर, अमेरिकेतील तरुणांना नोकरीच्या संधी निर्माण करून देण्यासाठी झाला पाहिजे.' ट्रम्प यांच्या या निर्णयाची अंमलबजावणी, 24 जूनपासूनच सुरू झालेली आहे. 

भारतीयांना मोठी मागणी
अमेरिकेत चीन आणि भारतातून आलेल्या तरुणांना मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी दिल्या जातात. विशेषतः आयटी क्षेत्रात  (IT professionals) भारतीय तरुणांना मोठी मागणी आहे. त्यापाठोपाठ चीनमधील तरुणही मोठ्या प्रमाणावर एचवन-बी व्हिसा मिळवून अमेरिकेत दाखल झाले आहेत. यामुळे अमेरिकेतील तरुणांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा बेरोजगारीचा मुद्दा चर्चेत आला आणि त्यामुळेच ट्रम्प यांनी एचवन-बी व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला. 

अमेरिकी नागरिकांना नोकऱ्या द्या, हा अगदी सोपा नियम सांगणाऱ्या आदेशावर आज, मी सही केली आहे. 

- डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष अमेरिका