ट्रम्प भाषण देताना नेहमी अडखळतात; नेमकं काय आहे कारण?

टीम ई-सकाळ
रविवार, 1 मार्च 2020

राष्ट्रपती झाल्यावर देखील ट्रम्प यांची असंख्य वेळा जीभ अडखळली आहे, एकदा 2017 साली देव अमेरिकेचं भलं करो असं म्हणाले आणि युनायटेड स्टेट्स एवजी युनाइटेड ‘श्टेट्स’ बोलून बसले.

वॉशिंग्टन Coronavirus : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प 36 तासांसाठी भारत दौऱ्यावर आले होते. त्यांनी या दौऱ्यात अहमदाबादेतील मोटेरा स्टेडीअममध्ये केलेल्या भाषणाची चर्चा सोशल मिडीयावर जोरात झाली. ट्रम्प यांनी हजारो लोकांसमोर केलेल्या या भाषणात केलेल्या विचित्र हिंदी उच्चारांवर सोशल मिडीयामध्ये प्रचंड मिम्स बनवलले गेले. भाषण करताना अडखळण्याची ही ट्रम्पयांची पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही ते अनेकवेळा भाषण करताना अडखळले आहेत. पण, त्यांच्या या अडखळण्या मागचं कारण काय आहे, याची चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झालीय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कधी कधी अडखळले डोनाल्ड ट्रम्प
भारतात ट्रम्प यांनी मोदी यांचा चायवाला असा उल्लेख करायचा होता. पण, त्याएवजी ते ‘च्यूवाला’ म्हणाले होते. त्यासोबतच स्वामी विवेकानंदांना 'विवेकामुंडुन', शोले चित्रपटाला ‘शोजे’ आणि सचिन तेंडूलकर ‘सुचिन’ म्हणाले होते.  याआधी मागच्या महिन्यात दिलेल्या एका भाषणात ट्रम्प अरब राष्ट्रांना धन्यवाद देत होते. त्यावेळी त्यांची अशीच अडचण झाली होती. ते त्यावेळी त्या देशाचं नावच घेऊ शकले नव्हते. त्यांना यूनाइटेड अरब अमिरात असं म्हणायचं होतं. पहिल्या दोन शब्द त्यांनी उच्चारले पण अमिरात म्हणताना परत त्यांची जीभ अडखळली. राष्ट्रपती झाल्यावर देखील ट्रम्प यांची असंख्य वेळा जीभ अडखळली आहे, एकदा 2017 साली देव अमेरिकेचं भलं करो असं म्हणाले आणि युनायटेड स्टेट्स एवजी युनाइटेड ‘श्टेट्स’ बोलून बसले.

आणखी वाचा - अमेरिकेत कोरोना व्हायरसचा पहिला बळी; सरकारचाही दुजोरा 

आणखी वाचा - बाळासाहेबांनी भाजपला पाठिंबा दिला होता, पण..: शरद पवार 

काय आहे कारण? 
ट्रम्प यांच्या सतत बोलताना अडखळण्यामागे नेमकं कारण काय असू शकेल? याविषयी अमेरिकेतील दाताचे डॉक्टर म्हणतात की, ट्रम्प त्यांचं खालच्या जबड्यावर जास्त जोर देऊन बोलणं, बोलताना अडखळणं यातून त्यांचा खालचा जबडा हललेला असल्याचं कळतं. पण, राष्ट्रपतीपदी निवड झाल्यावर केलेल्या तपासणीत ते फिट असल्याचं सांगितलं होतं. ट्रम्प भाषण करताना अडखळण्यामागचं कारण नेमकं काय असेल याविषयी नेहमी प्रश्न उपस्थित केले जातात. पण, याचं ठोसं असं कुठलंच उत्तर अद्याप मिळालेलं नाही. व्हाईट हाउसकडून यासंबंधीचे सांगण्यात आलं की, राष्ट्रपतींचा गळा सुकल्यामुळे ते अडखळले त्यापेक्षा काही वेगळं नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us president donald trump speech mistakes pronunciation