अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा तोल गेला; सायकलवरुन पडल्याचा व्हिडीओ व्हायरल

त्यांच्या बीचजवळ असलेल्या घराच्या परिसरात ते पत्नी जिल बायडन यांच्यासोबत सायकल चालवत होते.
Joe Biden
Joe BidenSakal

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा छोटासा अपघात झाला आहे. बीचच्या परिसरात सायकल चालवत असताना ते सायकलवरुन खाली पडले आहेत. या घटनेचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Joe biden falls from cycle Video Viral)

Joe Biden
'ग्लोबल कोविड समिट'मध्ये PM मोदी होणार सहभागी; बायडन यांचं निमंत्रण

डेलावेअरमध्ये ७९ वर्षीय अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन सायकल चालवत होते. त्यांच्या बीचजवळ असलेल्या घराच्या परिसरात ते पत्नी जिल बायडन (Jill Biden, Wife of American President Joe Biden) यांच्यासोबत सायकल चालवत होते. अचानक ते सायकलवरुन खाली पडले.

Joe Biden
जगातील सर्वांधिक मान्यताप्राप्त नेते मोदीच! बायडन यांनाही टाकलं मागे

ते खाली पडल्यानंतर आजूबाजूचे लोक त्यांच्या मदतीसाठी त्वरित धावून आले. त्यानंतर त्यांनी व्यवस्थित उठत आपण ठीक असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर सायकल चालवत असताना आपला तोल गेल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांना कोणतीही दुखापत झालेली नसून उपचारांची गरज नसल्याची माहिती व्हाईट हाऊसकडून (White House America) देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com