हाफीज सईदवरून अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले; काय केली सूचना?

हाफीज सईदवरून अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले; काय केली सूचना?

वॉशिंग्टन : जमात-उद-दावाचा संस्थापक आणि 2008 मधील मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदविरोधात संपूर्ण कायदेशीर कारवाई व्हावी आणि खटला वेगाने चालावा, याकडे पुरेपूर लक्ष द्यावे, अशी सूचना अमेरिकेने पाकिस्तान सरकारला केली आहे. दरम्यान, बालाकोट कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या हवाईयुद्धात पाकिस्तानने एफ-16 या लढाऊ विमानाचा गैरवापर केला होता आणि अमेरिकेने पाकिस्तानला याबाबत पत्र लिहून अहवाल दिला होता, अशी माहिती येथील वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. 

अमेरिकेच्या शस्त्रनियंत्रण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा विभागातील सहसचिव अँड्रिया थॉम्पसन यांनी ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानचे हवाई दलप्रमुख मुजाहिद अन्वर खान यांना हे पत्र लिहिले होते. या पत्रात 26 फेब्रुवारीच्या बालाकोट कारवाईचा थेट उल्लेख नसला, तरी काश्‍मीरमध्ये फेब्रुवारी महिन्यात एफ-16चा झालेला वापर चुकीचा असल्याचे म्हटले आहे.

भारतानेही त्या वेळी हाच दावा केला होता. बालाकोट हल्ल्यानंतर झालेल्या हवाईयुद्धात भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे एफ-16 पाडले होते. अमेरिकेने पाकिस्तानला हे विमान केवळ दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये वापरण्याच्या अटीवर विकले आहे. 

खटला वेगाने चालवा

दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरविल्याचा ठपका पाकिस्तानच्या दहशतवविरोधी न्यायालयाने सईद आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांवर ठेवला आहे. अमेरिकेने या निर्णयाचे स्वागत करीत पाकिस्तानकडून वेगवान खटला चालण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com