Coronavirus : जगभरात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एक चतुर्थांश अमेरिकी नागरिक

US records one fourth death of global COVID-19 fatalities
US records one fourth death of global COVID-19 fatalities
Updated on

वॉशिंग्टन : कोरोनाच्या संसर्गामुळे जगभरात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एक चतुर्थांश अमेरिकी नागरिक आहेत. तर कोरोनाची बाधा झालेल्यांच्या संख्येत एक तृतियांश अमेरिकी नागरिक आहेत. काल (ता. २७) प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महासत्तेला कोरोनाचा दंश
- जगभरातील रुग्ण : ३० लाख
- अमेरिकेतील रुग्ण : ९.९५ लाख
- जगभरातील मृत्यू :  २ लाख
- अमेरिकेतील मृत्यू : ५६ हजार

अमेरिकेने सर्वोच्च बिंदू ओलांडला
- अमेरिकेतील मृत्यू दर इतर देशांच्या मानाने कमी
- स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि तुर्कस्तानमधील एकूण रुग्णसंख्येहून अमेरिकेतील रुग्णांची संख्या अधिक
- न्यूयॉर्कला सर्वाधिक फटका, १८ हजारांहून अधिक जणांचे बळी
- सर्वोच्च रुग्णसंख्येची पातळी अमेरिकेने ओलांडली

कोरोनाला हरवून जॉन्सन पुन्हा कार्यालयात हजर

प्रत्येक अमेरिकी नागरिकांने खबरदारी घेत, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करावे आणि चेहऱ्यांसाठीचे मास्क वापरावेत. मागील काही दिवसांपासून बंद असलेली आमची अर्थव्यवस्था आम्ही खुली करत आहोत. - डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com