

US Import Duty Hike For Pakistan And Bangladesh
Esakal
US Tarrif on India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर भारतावर लादलेल्या आयात शुल्कात मोठी कपात केलीय. अमेरिकेकडून जगभरातील अनेक देशांवर आयात शुल्क लादण्यात आलं आहे. यात भारत सर्वाधिक आयात शुल्क देणारा देश होता. पण ट्रम्प यांनी आयात शुल्कात कपात केल्यानंतर भारत दक्षिण आशियातील पाकिस्तान, बांग्लादेश या देशांपेक्षा कमी आयात शुल्क देणारा देश ठरेल.