Coronavirus : अमेरिकेत २४ तासांत १४८० लोकांचा मृत्यू; ट्रम्प यांच्याकडून 'हा' कायदा लागू

वृत्तसंस्था
शनिवार, 4 एप्रिल 2020

हा कायदा बेईमानी अभिनेते आणि नफा कमवणाऱ्यांच्या तसेच आरोग्य व वैद्यकीय पुरवठ्यांची निर्यात थांबवनाऱ्यांच्या विरोधात काम करेल.

वॉशिंग्टन : कोरोनाव्हायरसने अमेरिकेत थैमान घातले असून त्याचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. 'टेलीग्राफ'च्या वृत्तानुसार, 'जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी'ने अमेरिकेत आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक १४८० मृत्यूंची आकडेवारी जाहीर केली आहे. ही आकडेवारी गुरुवार (ता.२) संध्याकाळ ते शुक्रवार (ता.३) संध्याकाळपर्यंतची आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेत एका दिवसात या संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या ही सर्वात मोठी आहे. आतापर्यंत एका दिवसात ११६९ मृत्यूची नोंद अमेरिकेत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ७४०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तेथे सुमारे तीन लाख लोक संक्रमित आहेत. अमेरिकन सरकार बचावाची सर्व पावले उचलण्याविषयी बोलत आहे, परंतु कोरोनाने अमेरिकेला ज्या प्रकारे वेढले आहे, त्या परिस्थितीमध्ये अद्याप काही सुधारणा झालेली नाही.

- चीनने पाकला लावला चुना; अंडरवेअरपासून बनवलेल्या मास्कचा केला पुरवठा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या देशातील नागरिकांना बाहेर पडताना मास्क घाला असा सल्ला दिला आहे. जगातील बऱ्याच संस्थांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक नाश झाला आहे (संक्रमित लोकांच्या संख्येच्या बाबतीत). त्यानंतर इटलीचा क्रमांक लागतो. तेथे जवळपास 1 लाख 20 हजार लोक संक्रमित आहेत, परंतु मृत्यूचा आकडा हा इटलीमध्ये सर्वाधिक आहे. इटलीमध्ये आतापर्यंत १४६०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

- Video : गळा दाबला, वर्दी फाडली; जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला ठाणेदार!

चीनमधील वुहान शहरात पसरलेल्या या विषाणूमुळे चीनमध्ये सुमारे ३२०० लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये सुमारे ११,००० लोक मरण पावले आहेत. जर्मनीमध्ये १२७५ जणांचा मृत्यू झाला आहे, फ्रान्समध्ये ६५२०, इराणमध्ये ३२९४, ब्रिटनमध्ये ३६०५ आणि दक्षिण कोरियामध्ये १७४ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात या विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या २५४७ पर्यंत वाढली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाची ४७८ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. आतापर्यंत देशात ६२ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

अमेरिकेत ‘संरक्षण उत्पादन कायदा’ लागू

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वैद्यकीय उपकरणांची निर्यात रोखण्यासाठी ‘अमेरिकन डिफेन्स प्रॉडक्शन कायदा’ लागू केला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये कोरोना व्हायरस टास्कफोर्स प्रेस ब्रिफिंगमध्ये बोलताना शुक्रवारी सांगितले की, ते कोरोना व्हायरस उपचारात वापरल्या जाणाऱ्या एन-९५ मास्क, सर्जिकल मास्क, ग्लोव्हज आणि इतर वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई)च्या उत्पादनाचे संरक्षण करण्यासाठी ‘संरक्षण उत्पादन कायदा’ लागू करत आहे.

- मोठी बातमी - "अशा लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत" : राज ठाकरे

हा कायदा बेईमानी अभिनेते आणि नफा कमवणाऱ्यांच्या तसेच आरोग्य व वैद्यकीय पुरवठ्यांची निर्यात थांबवनाऱ्यांच्या विरोधात काम करेल. या निर्देशावरून होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंट आणि फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी (फेमा) एकत्र काम करतील. आम्हाला घरगुती वापरासाठी या गोष्टींची तातडीने आवश्यकता आहे आणि त्या आमच्याकडे असलेच पाहिजे. तसेच त्यांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका आणि सर्व सूचनांचे पालन करा, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: USA president Donald trump applies Protection product Act to control Coronavirus