esakal | अमेरिकेत कोरोनाचा कहर, 24 तासांत तब्बल 1 लाख रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

USA corona

मागील 3-4 महिन्यांपासून अमेरिकेसह, भारत आणि ब्राझीलमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसले होते

अमेरिकेत कोरोनाचा कहर, 24 तासांत तब्बल 1 लाख रुग्ण

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

वॉशिंगटन: मागील 3-4 महिन्यांपासून अमेरिकेसह, भारत आणि ब्राझीलमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसले होते. ऑक्टोबर महिन्याच्या पुर्वार्धात अमेरिकेतील कोरोनाचे (US Coronavirus Report) रुग्ण काही प्रमाणात कमी होत असल्याचे दिसले होते.

सध्या अमेरिकेत निवडणुकीची धामधुम सुरु असताना वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर सरकारचे नियंत्रण आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटीच्या मतानुसार (Johns Hopkins University) मागील 24 तासांत अमेरिकेत नवीन तब्बल 99 हजारपेक्षा जास्त रुग्णांचं निदान झालं आहे.

दिलासादायक! हॉस्पिटलमध्ये दाखल न केलेल्यांच्या शरीरात आपोआप तयार होतेय सेल्युलर इम्युनिटी

जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटीच्या रिपोर्टनुसार, मंगळवारी रात्री 8:30 ते बुधवारी 8:30 पर्यंत अमेरिकेत जवळपास 1 लाख कोरोना रुग्ण आढळले आहेत. या 24 तासांत अमेरिकेत 99 हजार 660 कोरोना रुग्ण आढळले होते. मंगळवारीच अमेरिकेत राष्ट्रध्यक्षपदासाठी मतदान झाले होते. 

सध्या अमेरिकेतील कोरोना झालेल्यांची संख्या 94 लाखांच्या वर गेली आहे. या कोरोना महामारीमुळे अमेरिकेत आतापर्यंत 2 लाख 33 हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील कोरोना आकडेवारी पाहिली तर भारत सध्या कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. भारतातील कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या 83 लाखांच्या वर जाऊन 1 लाख 23 हजार 611 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

US Election: बायडन यांनी मोडले ओबामा पासून ते क्लिंटनपर्यंतचे सर्व विक्रम

ब्राझील कोरोना आकडेवारीत सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 55 लाखांच्या वर रुग्ण आढळले आहेत. याबद्दलची बातमी सिंडिकेट फिडने दिली आहे.

(edited by- pramod sarawale)
 

loading image
go to top