अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकीआधी कोविड-19 वरील लस उपलब्ध होईल; वाचा कोणी केला हा दावा

trump
trump
Updated on

नवी दिल्ली- 3 नोव्हेंबर 2020 रोजी अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पार पडणार आहे. मात्र, निवडणुकीआधीच कोरोना विषाणूविरोधातील लस उपलब्ध होईल, असा दावा वॉल स्ट्रिटने केला आहे. ब्लुमबर्गने याबाबतचे वृत्त दिले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीमध्ये फायदा व्हावा यासाठी 3 नोव्हेंबर पूर्वी एक किंवा दोन लस बाजारात येतील, असंही वॉल स्ट्रिटने म्हटलं आहे. 

जगभरातील वैज्ञानिक कोरोना विषाणूवर प्रभावी लस आणण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. सध्या 13 लसींचा वापर मानसांवर करण्यात आला आहे. तर 120 लस या प्राथमिक टप्प्यात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं आहे. अॅस्ट्राझेनका आणि मोडर्ना यासारख्या कंपन्यांनी आपलं उत्पादन वाढवलं आहे. तसेच या कंपन्या लाखो प्रायोगिक लसींचे उत्पादन यावर्षीच्या शेवटापर्यंत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

अमेरिकेतील अनेक वैज्ञानिकांनी 2021 पर्यंत लस उपलब्ध होईल, असं म्हटलं आहे. मात्र, व्हाईट हाऊसकडून निवडणुकीआधी लस उपलब्ध व्हावी यासाठी अन्न आणि औषध प्रशासनावर (FDA)प्रचंड दवाब टाकला जात असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच अमेरिकी सरकारकडून मोडर्ना, जॉनसन अॅन्ड जॉनसन, लंडमधील अॅस्ट्राझेनका, फ्रान्समधील सनोफी या लस निर्मितीच्या कार्यात गुंतलेल्या कंपन्यांना हातभार लावला जात असल्याचं म्हटलं जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा अध्यक्षपदावर विराजमान होण्याची संधी आहे. मात्र, कोरोना महासाथी विरोधात लढताना आलेले अपयश आणि देशात उसळलेली वर्णभेदविरोधी आंदोलनं यामुळे त्यांच्या मार्ग खडतर असल्याचं दिसत आहे. शिवाय डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यामुळे निवडणुकी आधी लस उपलब्ध करुन देण्याचा आणि त्याद्वारे पुन्हा एकदा आपलं अध्यक्षपद निश्चत करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. मात्र, त्यांचा हा प्रयत्न किती यशस्वी होतो हे पाहावं लागेल.

दरम्यान, कोरोना महासाथीने अमेरिकेमध्ये अक्षरश: हाहाकार माजवला आहे. अमेरिकेमध्ये आतापर्यंत 22 लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. तर आतापर्यंत 1 लाख 12 हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे अमेरिकी सरकार लवकरात लवकर लस उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com