लस पुरवठा नियोजनाचे ॲस्ट्राझेनेकाकडून समर्थन

यूएनआय
Thursday, 28 January 2021

युरोपीय महासंघाशी कोरोनावरील लसीसाठी करार केलेल्या ॲस्ट्राझेनेका कंपनीचे मुख्य कार्यवाह पास्कल सोरीओत यांनी पुरवठ्याच्या नियोजनाचे समर्थन केले आहे. महासंघाने करारास विलंब केल्यामुळे पुरवठ्यास विलंब होत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला.

लंडन - युरोपीय महासंघाशी कोरोनावरील लसीसाठी करार केलेल्या ॲस्ट्राझेनेका कंपनीचे मुख्य कार्यवाह पास्कल सोरीओत यांनी पुरवठ्याच्या नियोजनाचे समर्थन केले आहे. महासंघाने करारास विलंब केल्यामुळे पुरवठ्यास विलंब होत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला.

कोरोनाचे डोस मिळण्यास विलंब होत असल्यामुळे आणि विषाणूचा नवा प्रकार आढळल्यामुळे महासंघाच्या सदस्य देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोरीओत यांनी ला रीपब्ब्लीका या इटलीतील वृत्तपत्राला मुलाखत दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यांनी सांगितले, आमचे पथक लसउप्तादनातील अनेक समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. उत्पादन वाढविण्यात नेदरलँड््स आणि आणि बेल्जियम या दोन देशांतील प्रकल्पांमध्ये अडथळे येत आहेत. ही परिस्थिती गुंतागुंतीची आहे, कारण खास करून पहिल्या टप्प्यात तुम्हाला सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्याची गरज असते. त्यात यश आल्याचा आम्हाला विश्वास आहे, पण मुळात असे आहे की उत्पादन अपेक्षित वेळापत्रकाच्या तुलनेत दोन महिन्यांनी पिछाडीवर आहे. महासंघाने करारावर स्वाक्षरी करण्याचा निर्णय उशिरा घेतल्यामुळे पुरवठ्यामधील अडथळे दूर करण्यास कमी वेळ मिळाला. आणखी सरस पुरवठा करायला मला आवडेल का असे विचाराल तर स्वाभाविकपणे होय असेच सांगेन, पण फेब्रुवारीत जो पुरवठा करण्याची आमची योजना आहे, त्याचे प्रमाण छोटे नाही. युरोपमध्ये लाखो डोस द्यायचे आहेत.

कौतुक करावं की काळजी? 5 वर्षांचा चिमुकला चालवतोय लँड क्रूझर; पाहा VIDEO

युरोपीय महासंघाने तीन अब्ज डोससाठी ऑगस्टमध्ये करार केला. आणखी एक अब्ज डोसचा पर्यायही करारात आहे. करारास मान्यता देताच लगेच वितरण सुरु होईल अशी महासंघाची आशा होती. २७ देशांमध्ये मार्चपर्यंत ८० लाख डोस मिळतील अशी अपेक्षा आहे.

फायझरकडूनही विलंब
दरम्यान, महासंघाने फायझर-बायोएन््टेक कंपनीला ६० लाख डोसची ऑर्डर दिली आहे, ज्याचा पुरवठा यापूर्वीच सुरु झाला आहे. या कंपनीकडूनही बेल्जियममधील प्रकल्पाची क्षमता वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत वितरणास विलंब होईल असे गेल्याच आठवड्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रख्यात अर्थतज्ज्ञ जेनेट येलेन बनल्या अमेरिकेच्या पहिल्या महिला अर्थमंत्री

दक्षिण आफ्रिकी प्रकार
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या प्रकाराविरुद्ध लस विकसित करण्याचे प्रयत्न या कंपनीकडून सुरु आहेत. सध्याच्या लसींची परिणामकारकता कमी होण्याची शक्यता या प्रकारामुळे निर्माण झाल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

ब्रिटनमधील पुरवठा साखळीतही आम्हाला अडचणी आल्या, पण युरोपीय महासंघ करार करण्यापूर्वी तीन महिने अगोदर ब्रिटनने आमच्याशी करार केला होता. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्हाला तीन महिने अतिरिक्त मिळाले. परिणामी आम्ही अडथळ्यांवर मात करू शकलो.
- पास्कल सोरीओत, ॲस्ट्राझेनेकाचे मुख्य कार्यवाह

'जो बोलता है, वो बिकता है'; एलॉन मस्कनी असं काही म्हटलं की कंपनीचं नशीब फळफळलं

कोविड-१९ विषाणूवरील पहिली लस विकसित करण्यासाठी युरोपने अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आता कंपन्यांना कराराचे पालन करावेच लागेल आणि डोसचा पुरवठा करावाच लागेल. 
- उर्सुला वॉन डर लियेन, युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा

लस बनविणाऱ्या कंपन्या इतर देशांना डोस केव्हा निर्यात करणार याची माहिती युरोपला द्यावीच लागेल. २७ देश सदस्य असलेल्या आमच्या विभागातील नागरिकांच्या जिवाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही कोणतीही कार्यवाही करू.
- स्टेला किरीयाकिडेस, आरोग्य आयुक्त

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaccine supply planning support from AstraZeneca