जगातलं असं गाव जिथं आहेत शाकाहारी लोकं, गावकऱ्यांना दूधाचीही अ‍ॅलर्जी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vegan

येथे राहणारा प्रत्येक व्यक्ती शुद्ध शाकाहारी आहे.

जगातलं असं गाव जिथं आहेत शाकाहारी लोकं

जगात असे अनेक शाकाहारी लोक आहेत, जे मांस खात नाहीत तसेच प्राण्यांच्या माध्यमातून मिळणारे पदार्थ वापरत नाहीत. अशा लोकांना आणि त्यांच्या आहाराला व्हेगन म्हणतात. आजच्या काळात व्हेगन ही एक मोहीम बनली असून लोक इतरांना देखील प्राण्यापासून मिळणाऱ्या उत्पादनापासून सोडून देण्यासाठी जागरूक करत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गावाविषयी सांगणार आहोत. येथे राहणारा प्रत्येक व्यक्ती शुद्ध शाकाहारी आहे.

हेही वाचा: शाकाहारी आणि धुम्रपान करणाऱ्यांना कोविडचा धोका कमी

इस्रायलमधील नेवे शालोममध्ये डिमोना नावाचे एक छोटेसे गाव आहे. या गावात जेरुसलेममधील ३००० आफ्रिकन हिब्रू इस्रायली लोक राहतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गावातील लोक गेल्या ५० वर्षांपासून शुद्ध शाकाहारी आहेत. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील प्रत्येक व्यक्ती शाकाहारी आहे. इथे चिकन, मटण, मासे इत्यादी मांस खाल्ले जात नाही, तसेच दूधही प्यायले जात नाही.

हेही वाचा: या शहरात शुद्ध शाकाहारी हॉटेलची चलती 

गावातील लोक मीठही (salt) खात नाहीत...

मांस आणि दुधाव्यतिरिक्त डिमोन गावातील लोक आठवड्यातून ३ दिवस मीठ खात नाहीत आणि वर्षातून ४ आठवडे साखर खात नाहीत. त्यांचे जेवण इतके साधे असते की, ते त्यात जास्त मसाले किंवा इतर काहीही घालत नाहीत. लोकांचे म्हणणे आहे की, या गावात कोणीही अन्नाची चव टेस्ट घेण्यासाठी जात नाहीत, कारण येथील अन्न इतर लोकांना बेचव वाटू शकते. हिब्रू इस्रायली लोकांचा असा विश्वास आहे की, अॅडम आणि इव्ह देखील शाकाहारी होते, म्हणून हे लोक मांस खात नाहीत. येथील लोक शरीराला मंदिरासारखे पवित्र मानतात आणि ते मांस किंवा मसाल्यांनी त्याला अपवित्र करु इच्छित नाहीत.

हेही वाचा: शाकाहारी कंडोम म्हणजे काय? बाजारात का वाढली मागणी?

शरीराची विशेष काळजी घेतात

दिमोना गावातील लोकांशी संबंधित आणखी एक खास गोष्ट म्हणजे येथील लोक आपल्या शरीराची प्रत्येक प्रकारे काळजी घेतात. नास डेलीच्या व्हिडिओनुसार, मांसाशिवाय येथील लोक दारू आणि सिगारेटही पीत नाहीत. एवढेच नाही तर लोक आठवड्यातून तीन वेळा व्यायाम करतात. यासोबतच ते दर महिन्याला बॉडी मसाजही करून घेतात. शरीराची एवढी काळजी घेतल्याने इथल्या लोकांकडे पाहून त्यांच्या खऱ्या वयाचा अंदाज लावणेही अवघड आहे.

loading image
go to top