Viagra : CIA ने तालिबान्यांच्या विरोधात हत्यार म्हणून वापरली व्हायग्रा? कसं ते वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viagra

Viagra : CIA ने तालिबान्यांच्या विरोधात हत्यार म्हणून वापरली व्हायग्रा? कसं ते वाचा

गेल्या काही वर्षांपासून अनेकजणांना भेडसावत असलेल्या लैंगिक समस्यांवर मात करण्यासाठी लोक व्हायग्रा गोळीचं सेवन करायला पसंती देत आहे. व्हायग्रा ही गोळी पुरुषांना सतावणाऱ्या इरेक्टाइल डिसफंक्शनसाठी वापरात आणली गेली होती. परंतु या गोळीचा वापर लोकांनी सेक्सपॉवर वाढवण्यासाठी केलेला आहे.

व्हायग्रा हे अशा काही औषधांपैकी एक आहे. ज्याचे नाव लोकांना उघडपणे घेणे आवडत नाही. त्याचे नाव ऐकल्यावर, लोक खरेदीदाराला पुरुषी दुर्बलतेशी जोडतात. या गोळीचे नाव घ्यायला लोक लाजतात. पण, तूम्हाला माहितीय का याच गोळीने तालिबान्यांना पकडण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराची मदत केली होती. हे खरं आहे. कसे ते पाहुयात.

काय आहे व्हायग्राचा इतिहास

40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे पुरुष नपुंसकतेमूळे त्यांच्या लैंगिक जीवनाचा त्याग करत होते. त्याच वेळी 1998 मध्ये फायझर फार्मा कंपनी अशा लोकांसाठी वरदान म्हणून पुढे आली. लैंगिक समस्यांचा सामना करणाऱ्या लोकांसाठी व्हायग्राचा शोध लावला. पण हा शोध अपघाताने लागला होता.

1990 च्या दशकाच्या सुरुवातीस, फायझर ब्रेस्टच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी 'सिल्डेनाफिल' नावाच्या नवीन औषधाचा प्रयोग करत होते. या औषधाने छातीत दुखणे कमी करण्यास मदत झाली नाही. परंतु पुरुषांमध्ये इतर लक्षणे दिसायला लागली. टेस्ट करताना काही पुरूषांना या गोळीचे सेवन करण्यास सांगितले होते. त्यांनी ते केल्यानंतर छातीत दुखण्याचा त्रास कमी झाला नाही. पण, त्यांचे लिंग जास्त काळ ताठ राहत होते. ज्यामूळे त्यांचा सेक्स टाईम वाढला होता.

27 मार्च 1998 रोजी, यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन एजन्सी (FDA) ने या उपचाराला परवानगी दिली. एप्रिलमध्ये लहान निळ्या औषधाने यूएस स्टोअरमध्ये पहिल्यांदा विक्रीसाठी आली.

ही निळसर रंगाची गोळी देशाच्या लष्कराला कशी मदत करू शकते. यावर अनेकांना विश्वास ठेवणे कठीण आहे. पण हे खरं आहे. दहशतवादी संघटना तालिबानचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेला व्हायग्राची लाखमोलाची मदत झाली आहे.

व्हायग्रासाठी काहीही करायला लोक तयार होते, अशा काळात सीआयएने अनेक अफगाण लोकांना व्हायग्रा देण्याची लाच दिल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये उल्लेख आहे. व्हायग्राच्या गोळीच्या बदल्यात अफगाण नागरिकांनी तिथल्या दहशतवाद्यांना पकडून देण्याचे वचन दिले आणि ते पाळले.

अफगाण लोकांच्या मदतीमुळेच अनेक तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात अमेरिकन सुरक्षा यंत्रणेला यश आले होते. कारण व्हायग्राच्या बदल्यात तालिबानमधील सामान्य नागरिकांनी दहशतवाद्यांचे पत्ते CIA ला पुरवले होते.

2001 पर्यंत या गोळीने विक्रीच्या बाबतीत 1 अब्जचा टप्पा पार केला होता. वायग्रा टॅब्लेट लिंगामध्ये रक्ताभिसरण प्रक्रीया सुधारते. त्‍यामुळे पुरूषांचे लिंग बराच काळ ताठ राहते. दहशतवाद्यांवरील या मोठ्या कारवाईनंतर चोरून घेतले जाणारे व्हायग्राचे नाव जगभरातल्या लोकांच्या तोंडात होते.